Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

Plane Crash In Baramati: बारामतीमध्ये बुधवारी विमान कोसळलं. सरावादरम्यान ही घटना घडली. वैमानिकाची स्टंटबाजी असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
Baramati Plan Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप
Baramati Plane CrashSaam Tv
Published On
  • बारामतीत पुन्हा विमान अपघात

  • प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या स्टंटबाजीचा आरोप

  • रेडबर्ड कंपनीचे विमान कोसळले

  • बारामती विमानतळ सुरक्षाबाबत प्रश्न

बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात झालाय. प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचा हा अपघात नेमका कसा झाला? प्रशिक्षणार्थी वैमानिकांवर स्थानिकांनी कोणता आरोप केलाय? बारामतीत वारंवार विमान अपघात का होतायत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

बारामती पुन्हा एकदा विमान अपघातानं हादरलीय. ज्या गोजुबावी गावाच्या हद्दीत साडेतीन महिन्यांपूर्वी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला... त्याच गावात पुन्हा एकदा एक शिकाऊ पायलटचं विमान कोसळलंय. 'रेडबर्ड' कंपनीचं हे विमान कोसळताना नेमकं काय घडलं ऐका...

Baramati Plan Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप
Breaking : भयंकर दुर्घटना! खासगी विमान कोसळलं, थेट डोंगराला जाऊन धडकले

दरम्यान या विमान अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.मात्र अजितदादांचा अपघात झाला त्या गोजुबावी गावात याआधीही अनेक वेळा प्रशिक्षणार्थी पायलटचा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय..गोजुबावी गावाच्या परिसरात वैमानिकांना रेडबर्ड कंपनीकडून प्रशिक्षण दिलं जातं.. त्यात बारामती परिसरात आतापर्यंत 6 वेळा खासगी प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचा अपघात झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आलीय.

Baramati Plan Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप
Baramati plane crash : बारामतीत पुन्हा एक विमान अपघात

5 फेब्रुवारी 2019 ला इंदापूर तालुक्यातील रुई गावात प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचा अपघात झाला... त्यानंतर सप्टेंबर 2021 ला गोजुबाबी गावात रेडबर्ड कंपनीचं विमान कोसळलं. 26 जुलै 2022 रोजी कडबनवाडी गावात पुन्हा विमान कोसळलं आणि त्यानंतर कटफळ गावात 19 ऑक्टोंबर आणि 22 ऑक्टोंबर 2023 रोजी अवघ्या 4 दिवसांत दोन वेळा प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचा अपघात झाला. तर दुसरीकडे यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलीय. इथले प्रशिक्षणार्थी पायलट्सकडून स्टंटबाजी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केलाय.

Baramati Plan Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप
Plane Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत विमान कोसळलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

एकीकडे अजित पवारांच्या अपघाताला साडेतीन महिने उलटूनही अपघातामागील ठोस कारण समोर आलेलं नाही. त्यात बारामतीत पुन्हा विमान कोसळल्यामुळे विमान कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे बारामतीतील विमानतळ आणि प्रशिक्षण केंद्र आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. त्यामुळे नागरी उड्डयण मंत्रालय वारंवार होणाऱ्या अपघातांकडे गांभीर्याने पाहणार की नेहमीप्रमाणे आश्वासनं देऊन वेळ मारून नेणार ? हे पाहणं महत्वाचं आहे.

Baramati Plan Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप
Baramati Plane Crash: बारामती विमान अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com