

लॉस एंजेलिसमध्ये छोटं विमान कोसळलं
विजेच्या तारांना धडकल्यानंतर अपघात झाला
या विमान अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अमेरिकेमध्ये छोटे विमान कोसळल्याची घटना घडली. कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमधील पॅकोइमा याठिकाणी हे विमान कोसळले. विमान कोसळतानाचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विमान अपघातामध्ये पायलट गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या संपूर्ण विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना व्हाईटमन विमानतळाजवळ घडली. पायलट विमानतळावर विमान उतरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी हे विमान विजेच्या तारांना धडकले. त्यानंतर विमानाचा तोल जाऊन खाली कोसळले. हा भयंकर विमान अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे विमान एक इंजिन असलेले होते.
या विमान अपघातात ७० वर्षीय पायलट गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पायलटचा जीव वाचवण्यासाठी मदत केली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जखमी झालेला पायलट विमानात अडकला होता पण काही नागरिकांनी त्यांना बाहेर काढले.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, एक-इंजिन असलेले हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. अपघात झाला तेव्हा विमान विमानतळाभोवती घिरट्या घालत होते. हे विमान ऑटो शॉपजवळील पार्किंगच्या लॉटमध्ये पडले. या अपघातानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ज्यामुळे अनेक घरे आणि दुकानांवर परिणाम झाला.
विमानतळ दाट लोकवस्तीच्या भागात असल्यामुळे असे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. या घटनेनंतर काही स्थानिकांनी तर विमानतळ बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी येथे अनेक अपघात झाले आहेत त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आता अधिक कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत स्थांनिकांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.