Maharashtra monsoon exit 2026 latest update : महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, पुणे वेधशाळेने यंदाचा पावसाळा संपल्याची आणि मान्सूनच्या 'एक्झिट'ची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. मान्सूनचा मुख्य काळ असलेल्या जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात एकूण ८१ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती आज देण्यात आली.
पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, "१ जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा मुख्य काळ मानला जातो, जो आज अधिकृतरित्या संपला आहे. राज्यातून पाऊस पूर्णपणे गायब झाला नसला, तरी मान्सूनचा मुख्य हंगाम आता समाप्त झाला आहे."
येत्या २ ते ३ दिवसांत परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. राज्यात सरासरी ८१ टक्के पाऊस झाला असून यामध्ये कोकण विभागात १४ टक्के, मध्य महाराष्ट्रात ११ टक्के, विदर्भात २३ टक्के, तर सर्वाधिक तूट मराठवाडा विभागात नोंदवली गेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यात चिंतेचे ढग जमा झाले असून, तेथे तब्बल ४० टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
उद्यापासून (१ ऑक्टोबर) ऑक्टोबर महिना सुरू होत असल्याने आज आणि उद्या राज्यातील सरासरी तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील १ ते २ दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ भागात तापमानाचा पारा वाढलेलाच राहील. १ आणि २ ऑक्टोबरनंतर हवामानात कोणतीही नवीन प्रणाली तयार होत नसल्याने कुठेही पावसाची शक्यता नाही. शिवाय, ऑक्टोबर महिन्यात सरासरी तापमानात अंशतः वाढ होते, असेही पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
कोकण व पश्चिम महाराष्ट्र:
मुंबई उपनगर: ९ टक्के तूट
ठाणे: ११ टक्के तूट
पालघर: २१ टक्के तूट
रायगड: ६ टक्के तूट
रत्नागिरी: १६ टक्के तूट
सिंधुदुर्ग: ३६ टक्के तूट
पुणे: १४ टक्के तूट
नाशिक: ३३ टक्के तूट
कोल्हापूर: १५ टक्के तूट
सातारा: २८ टक्के तूट
सांगली: २४ टक्के तूट
सोलापूर: ५८ टक्के तूट
उत्तर महाराष्ट्र:
धुळे: १९ टक्के तूट
जळगाव: ११ टक्के तूट
नंदुरबार: ३९ टक्के तूट
मराठवाडा:
छत्रपती संभाजीनगर: १९ टक्के तूट
धाराशिव: ४५ टक्के तूट
बीड: ५१ टक्के तूट
लातूर: ३८ टक्के तूट
जालना: ४८ टक्के तूट
परभणी: ४० टक्के तूट
नांदेड: ३४ टक्के तूट
हिंगोली: ४९ टक्के तूट
विदर्भ:
बुलढाणा: १७ टक्के तूट
वाशीम: ३५ टक्के तूट
अकोला: ३७ टक्के तूट
अमरावती: ४० टक्के तूट
यवतमाळ: २३ टक्के तूट
वर्धा: २८ टक्के तूट
नागपूर: २८ टक्के तूट
चंद्रपूर: २९ टक्के तूट
भंडारा: १६ टक्के तूट
गडचिरोली: १५ टक्के तूट
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.