Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

₹650 crore bank scam latest news : हरियाणा-चंदीगडमधील ६५० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी CBI ने कथित मुख्य सूत्रधार ऋभव ऋषीला अटक केली आहे. आरोपपत्रानुसार, डान्सरला दरमहा १० लाख रुपये दिल्याचा दावा असून आलिशान खर्चाचाही तपास सुरू आहे.
₹650 crore bank scam latest news
₹650 crore bank scam latest newsSaam TV
Published On: 

Ribhav Rishi CBI arrest latest news : हरियाणातील तब्बल ६५० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार ऋभव ऋषी याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर अटक केली आहे. आरोपी ऋभव ऋषीने अनेक बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती आणि या घोटाळ्यातील पैशांवर तो आलिशान आयुष्य जगत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋभव ऋषी एका प्रसिद्ध डांसरवर दरमहा तब्बल १० लाख रुपये खर्च करत होता. सीबीआय गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मागावर होती. अखेर गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सीबीआयने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून, या घोटाळ्यात आणखी कोणाकोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

₹650 crore bank scam latest news
तेल रिफायनरीत भीषण स्फोट! आजूबाजूच्या इमारती हादरल्या, काळा धूर अन्...; परिसरात उडाली प्रचंड घबराट

हरियाणा आणि चंदीगडमधील ६५० कोटींच्या बँक घोटाळ्याच्या तपासादरम्यान सीबीआयने अनेक पुरावे उघड केलेत. या घोटाळ्याचा सूत्रधार आणि मुख्य आरोपी रिभव ऋषी याचे महिलेसोबत असलेले जवळचे संबंध आणि त्याने तिच्यावर केलेला उधळपट्टीचा खर्चही तपासात उघड झाला आहे. बीआयने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला. गस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत ऋषीने त्या महिलेला दरमहा १० लाख रुपये दिले. त्या महिलेने तपास यंत्रणेला सांगितले की, नृत्याची कारकीर्द सोडण्याच्या बदल्यात ऋषीने डान्सरला रक्कम देण्याचे अश्वासन दिले होते. तिला सहा महिन्यांत ५६ लाख रुपये दिल्याचेही उघड झालेय. त्याने स्वतःची ओळख आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शाखा व्यवस्थापक म्हणून करून दिली होती.

₹650 crore bank scam latest news
Housing Society : घरमालकांसाठी महत्त्वाचा नियम! फ्लॅट भाड्यानं देताना केली १ चूक, पुण्यात १३० जण अडचणीत; कायदा काय सांगतो? वाचा

सीबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, ऋषी त्या महिलेला मार्च-एप्रिल २०२५ मध्ये चंदीगडमधील एका कार्यक्रमात भेटला. त्या ठिकाणी ती डान्स करण्यासाठी आली होती. ते ८ मे रोजी जयपूरमधील एका फार्महाऊस पार्टीत पुन्हा भेटले. ५ जुलै रोजी ऋषीने मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये लग्नाची मागणी घातली, असा आरोप आहे. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, त्याने स्वतःची ओळख एक इव्हेंट प्लॅनर आणि तांदळाच्या आयात-निर्यात व्यवसायात असलेला व्यावसायिक म्हणून करून दिली. त्या महिलेने सीबीआयला सांगितले की, ऋषीने तिच्याशी लग्न करण्यासाठी घटस्फोट द्यायलाही तयार होता.

₹650 crore bank scam latest news
MSP : शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! मोदी कॅबिनेटमध्ये 'या' ३ महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; तुमच्यावर काय होणार परिणाम?

चंदीगडमधील नोवोटेल, हॉलिडे इन आणि हयात, दिल्लीतील अंदाज, जेडब्ल्यू मॅरियट आणि आयटीसी मौर्य, तसेच गोव्यातील ताज हॉटेलमध्ये दोघेजण राहत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ऋषी आणि ती महिला इतर आरोपी आणि काही नर्तकांसोबत मकाऊ आणि नंतर थायलंडला गेले. त्या महिलेने तपास यंत्रणेला सांगितले की, ऋषी तिला दुबई विमानतळाजवळील एका नवीन चार बेडरूमच्या डुप्लेक्समध्येही घेऊन गेला होता. पाच ते दहा वर्षांत तिच्यासोबत दुबईमध्ये स्थायिक व्हायचे होते आणि म्हणूनच त्याने ते घर निवडले होते. जानेवारी २०२६ मध्ये, ते दोघे पुन्हा दुबईला गेले, जिथे ऋषीने एक टोयोटा लँड क्रूझर बुक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com