MSP : शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! मोदी कॅबिनेटमध्ये 'या' ३ महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; तुमच्यावर काय होणार परिणाम?

Rabi crop : मोदी सरकारने 2027-28 रब्बी हंगामातील सहा पिकांच्या MSP मध्ये वाढ मंजूर केली आहे. गव्हाचा MSP ₹2,610 तर करडईचा ₹7,215 प्रति क्विंटल झाला आहे. जाणून घ्या नवीन दर आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम.
Modi Cabinet
Modi Cabinet
Published On: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशहिताचे तीन मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यासह, २.७९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांत शेतकऱ्यांचे हित जोपासणारा एमएसपी वाढीचा प्रस्ताव, देशात हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी 'ग्रीन एनर्जी कॉरिडोर Phase-3' (Green Energy Corridor) ची मंजुरी, तसेच दिल्लीतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आधुनिक एआय-आधारित इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) चा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयांचा थेट फायदा देशातील शेतकरी, नागरिक आणि पर्यावरण क्षेत्राला होणार आहे. मंत्रिमंडळाने एकूण १,८६,४०५ कोटी रुपयांच्या खर्चासह हरित ऊर्जा कॉरिडॉर योजनेच्या तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिली, ज्याचा उद्देश राज्यांतर्गत पारेषण प्रणाली मजबूत करणे आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १३५ गिगावॅटपर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जेच्या पारेषणास सुलभ करणे आहे.

Modi Cabinet
तेल रिफायनरीत भीषण स्फोट! आजूबाजूच्या इमारती हादरल्या, काळा धूर अन्...; परिसरात उडाली प्रचंड घबराट

गव्हासाठी रब्बी हंगामातील किमान आधारभूत किंमत (MSP) २५ रुपये प्रति क्विंटलने वाढवण्यात आली आहे. करडईसाठी ६७५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. हरित ऊर्जा कॉरिडॉर-३ योजनेअंतर्गत राज्यातील पारेषण जाळे अधिक मजबूत केले जाईल आणि जलाशयांमध्ये ५० गिगावॅट-तास (GWh) साठवण क्षमतेची भर पडेल. दिल्लीतील नवीन इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममध्ये ४२ वाहतूक मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी अ‍ॅडॅप्टिव्ह सिग्नल्स, स्वयंचलित अंमलबजावणी आणि रिअल-टाइम वाहतूक डेटाचा वापर केला जाईल.

Modi Cabinet
कल्याण-बदलापूर-कर्जत हायवेवरच शेती करणार; दुकानदारांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाचे धाबे दणाणले

मंत्रिमंडळाने २०२७-२८ च्या विपणन हंगामासाठी सर्व सहा निर्धारित रब्बी पिकांकरिता वाढीव किमान आधारभूत किंमतींना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल, असे सरकारने सांगितले. करडईच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. करडई प्रति क्विंटल ₹675 ने वाढ होऊन किमान आधारभूत किंमत (MSP) ₹7,215 वर पोहोचली आहे. मोहरी आणि रेपसीडच्या किमान आधारभूत किंमती ₹413 ने वाढून प्रति क्विंटल ₹6,613 झाल्या, तर मसूरच्या दरात ₹390 ची वाढ होऊन तो ₹7,390 झाला. हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत (MSP) ८३ रुपयांनी वाढवून ५,९५८ रुपये प्रति क्विंटल आणि गव्हाची किमान आधारभूत किंमत २५ रुपयांनी वाढवून २,६१० रुपये करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com