कल्याण-बदलापूर-कर्जत हायवेवरच शेती करणार; दुकानदारांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाचे धाबे दणाणले

Kalyan Karjat Highway latest news : कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरील बदलापूरजवळ चामटोली गावात रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
Kalyan Karjat Highway latest news
Kalyan Karjat Highway latest newsSaam TV
Published On: 

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरील बदलापूरजवळील चामटोली गावातील शेतकरी आणि स्थानिक व्यापारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तात्काळ दुकाने रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्याने ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. "आमच्या दुकानांवर तोडक कारवाई झाल्यास आम्ही थेट राज्य महामार्गावरच शेती करून उदरनिर्वाह करू," असा आक्रमक इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते धनाजी ईरमाळी यांनी स्थानिक प्रशासनाला प्रश्न लवकर सोडावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला.

Kalyan Karjat Highway latest news
Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

नेमका वाद काय?

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर चामटोली गावात स्थानिक शेतकऱ्यांचे काही छोटे ढाबे आणि व्यावसायिक दुकाने आहेत. याच दुकानांवर कारवाईचा बडगा उगारात सार्वजनिक बांधकाम विभागाने मालकांना नोटीसा पाठवल्या आहेत. मात्र, या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

Kalyan Karjat Highway latest news
Pradeep Purnekar : ठाण्यात राजकीय वादातून ५ राऊंड फायर अन्.. आरोपी पप्प्याला बेड्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट

'आधी मोबदला बुडवला, आता रोजगारही हिरावताय'

स्थानिक जमीन मालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. "सुमारे १२ वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाने आमच्या हक्काच्या जमिनी अधिग्रहित केल्या. मात्र, त्याचा कोणताही मोबदला आजतागायत आम्हाला मिळालेला नाही. जमिनी गेल्यानंतर स्थानिक तरुणांनी उदरनिर्वाहासाठी महामार्गालगत दुकाने थाटली होती. आता हा रोजगारही हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा संताप चामटोलीतील ग्रामस्थांनी व्यक्त केला.

प्रशासनाने सक्तीने तोडक कारवाई सुरू ठेवल्यास रस्त्यावरच शेती करून आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने चामटोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com