Shiv Sena UBT Division Chief Pradeep Purnekar Shot Dead : ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजाता पुर्णेकर कार्यालयात असतानाच ४ हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांनी पाच ते सहा राऊंड फायरिंग केल्या. त्यानंतर कोयत्याने वार करून पुर्णेकरांचा जीव घेतला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बाकीच्या आरोपींना पकडण्यासाठी क्राइमब्रांच आणि ९ ते १० टीम रवाना करण्यात आल्या आहेत, लवकरच बाकीचे आरोपी पकडले जातील..
ठाण्यात राजकीय आणि सोशल मीडियावरील वादातून तुफान गोळीबाराची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेची माहिती देताना सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले की, "या घटनेत एकूण ५ राऊंड फायर करण्यात आले आहेत. राजकीय आणि सोशल मीडियावरील जुन्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे." दरम्यान, घटनेतील उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखेसह (Crime Branch) पोलिसांची ९ ते १० विशेष पथके रवाना करण्यात आली असून, उरलेल्या सर्व आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पत्नीचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
या दुर्दैवी घटनेनंतर प्रदीप पूर्णेकर यांच्या समर्थकांनी मानपाड्यात तीव्र आक्रमक पवित्रा घेतला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पूर्णेकर यांच्या पत्नीने व्यक्त केलेला आक्रोश अत्यंत हृदयद्रावक होता. "पप्या शिंदे हा प्रदीप यांच्यासोबत एका ताटात जेवला आहे. त्याच्या मुलाच्या बारशाला मी स्वतः कपडे घेऊन गेले होते," अशा शब्दांत अश्रूंना वाट मोकळी करून देत त्या म्हणाल्या, "माझा माणूस मला परत आणून द्या. मला ही दुनियादारी आणि हे राजकारण नको आहे, आम्ही याची खूप मोठी किंमत चुकवली आहे."
आदित्य ठाकरेंचा संताप; पोलिसांकडून कारवाई सुरू
२९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या हत्याकांडानंतर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत गृहव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याप्रकरणात एकूण ५ आरोपींचा समावेश आहे. त्यापैकी एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू आहे. उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.