सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Small Savings Scheme Interest Rates : केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. PPF वर ७.१% तर सुकन्या समृद्धी योजनेवर ८.२% व्याजदर कायम राहणार आहे.
Small Savings Schemes New Interest List :
Small Savings Schemes New Interest List :
Published On: 

Small Savings Schemes New Interest List : स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये (लहान बचत योजना) गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६) पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि वरिष्ठ नागरिक बचत योजनेसारख्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर सरकारने जसेच्या तसे ठेवले आहेत.

Small Savings Schemes New Interest List :
Housing Society : घरमालकांसाठी महत्त्वाचा नियम! फ्लॅट भाड्यानं देताना केली १ चूक, पुण्यात १३० जण अडचणीत; कायदा काय सांगतो? वाचा

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या तिमाहीत व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) पूर्वीप्रमाणेच ७.१% आणि सुकन्या समृद्धी योजनेवर ८.२% दरानेच व्याज मिळत राहील. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेत असते.

लहान बचत योजनांचे नवीन व्याजदर

जुलै-ऑगस्ट तिमाहीत उपलब्ध असलेले अल्पबचत योजनांवरील व्याजदर आर्थिक वर्ष २०२७ च्या तिसऱ्या तिमाहीतही तेच राहतील.

भारतातील लाखो लोक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. बहुतेक लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऐवजी सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात.

प्रसिद्धीपत्रकात मंत्रालयाने लिहिले आहे की, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी (१ ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६) विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदर हे आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी नमूद केलेल्या दरांप्रमाणेच राहतील.

Small Savings Schemes New Interest List :
Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

या प्रमुख १२ योजनांचे सध्याचे वार्षिक व्याजदर खालीलप्रमाणे

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या लोकप्रिय दीर्घकालीन बचत योजनेवर पूर्वीप्रमाणेच ७.१% वार्षिक व्याजदर मिळत राहील.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या या योजनेवर सर्वाधिक ८.२% इतका आकर्षक व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.

वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या सुरक्षित योजनेवर ८.२% दराने व्याज दिले जाईल.

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) ५ वर्षांच्या या सरकारी बचत प्रमाणपत्रावर ७.७% वार्षिक व्याजदर मिळेल.

किसान विकास पत्र (KVP) या योजनेवर ७.५% व्याजदर निश्चित करण्यात आला असून, यातील गुंतवणूक ११५ महिन्यांत (९ वर्षे ७ महिने) दुप्पट होते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) महिला आणि मुलींसाठीच्या या २ वर्षांच्या विशेष योजनेवर ७.५% दराने व्याज दिले जाईल.

मासिक उत्पन्न योजना (MIS) दरमहा निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर ७.४% वार्षिक व्याजदर कायम आहे.

पोस्ट ऑफिस बचत खाते (Savings Account) सामान्य बचत खात्यावर ४.०% वार्षिक व्याज मिळत राहील.

१ वर्षाची टाईम डिपॉझिट (TD): १ वर्षाच्या मुदती ठेव योजनेवर ६.९% व्याजदर निश्चित आहे.

२ वर्षांची टाईम डिपॉझिट (TD): २ वर्षांच्या मुदतीच्या ठेवीवर ७.०% दराने व्याज मिळेल.

३ वर्षांची टाईम डिपॉझिट (TD): ३ वर्षांच्या मुदती ठेव योजनेवर ७.१% इतका व्याजदर आहे.

५ वर्षांची टाईम डिपॉझिट (TD): ५ वर्षांच्या मुदतीच्या ठेवीवर ७.५% व्याजदर लागू राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com