

राहुल गांधी यांना विनंती आहे की आजूबाजूला असलेल्यांना सोडून थोडं खाली येऊन कार्यकर्त्यांशी बोला तरच तुम्ही पंतप्रधान व्हाल, अशा शब्दांत काँग्रेस नेते आबा बागुल यांनी आपल्या मनातील सल व्यक्त केली आहे. मी कोणाला पाडण्यासाठी उभा नाही, मी निवडून येणार, मला सगळ्या पक्षाचे लोकं मदत करणार, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पुण्यातील पर्वती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला ही जागा मिळाली आहे. शरद पवार गटाच्या आश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या जागेवरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते आबा बागुल देखील या जागेसाठी इच्छुक होते. त्यांनी या जागेसाठी परस्पर उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राहुल गांधींना कार्यकर्त्यांशी संवाद साधा अशी आर्त हाक दिली आहे.
काँग्रेसने पर्वती सहयोगी पक्षाला का दिला? कार्यकर्त्यांना नैराश्य आलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांच्या दारात जाऊन बसायचं का? लोकसभेला नाना पटोले यांनी मला शब्द दिला होता? त्या शब्दाचं काय झालं?, असे प्रश्न आबा बागुल यांनी विचारले आहेत.
सांगली पॅटर्न केला तरच काँग्रेस जिवंत राहणार. काँग्रेस पक्षाला विनंती आहे कार्यकर्त्यांसाठी काही तरी करा. कौन बनेगा मुख्यमंत्री या स्पर्धेत कार्यकर्त्याला विसरू नका. ४०, ५० वर्ष कार्यकर्ते राबतात, ज्यांना महात्मा गांधी कळत नाहीत त्यांना काँग्रेस जवळ करताय, अशा शब्दांत आबा बागुल यांनी मनातील खंत व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.