Maharashtra Assembly Election : पर्वती सोडून कुठे जाऊ? माधुरी मिसाळ उमेदवारीवर ठाम, पुण्यात महायुतीसमोर पेच!

Pune Parvati Assembly constituency : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झालाय. माधुरी मिसाळ यांनी आपण येथूनच लढणार असल्याचे सांगितलेय.
madhuri Misal
madhuri Misalmadhuri Misal
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्यासमोर पक्षांतर्गत आव्हान निर्माण झालेले आहे. त्यावर मिसाळ यांनी भाष्य करत मी पर्वती मधूनच लढणार आहे. हा मतदारसंघ सोडून मी कुठे जाऊ? असा प्रश्‍न उपस्थित केला. गेल्या पाच वर्षातील केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मिसाळ यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

गेल्या १५ वर्षापासून मी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आले आहे. स्वारगेट उड्डाण पूल, सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पूल हे वाहतूक कोंडी कमी करणारे प्रकल्प मार्गी लावले. सिंहगड रस्त्यावरून खडकवासला ते हडपसर मेट्रो मार्गाला राज्य सरकारने मान्यता दिली. ही मेट्रो करता सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची तोडफोड करावी लागणार नाही. पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित केले. यासह अनेक कामे केली आहेत, असे मिसाळ यांनी सांगितले.

मी आमदार असेल किंवा नसेल पण या कामांमुळे माझी ओळख मतदारसंघात असणार आहे.विधानसभेसाठी उमेदवारी मागावी यात काहीही चूक नाही, एकदा पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होते. ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचे काम करणार. पर्वतीमध्ये जातीवर मतदान होत नाही, तेथे काम बघुनच मतदान होते. पक्ष निर्णय घेईल, असे मिसाळ म्हणाल्या.

नशिबाच्या पुढे काही मिळत नाही -

पर्वतीच्या तीन वेळा आमदार राहिलेल्या मिसाळ यांना मंत्रीपदाबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, कामाचा आणि मंत्रिपदाचा काही संबंध नाही. पक्षाला जेव्हा योग्य वेळ वाटते तेव्हा मंत्री केले जाते. वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पुढे काही मिळत नाही. मी पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढणार असून, त्या संदर्भाने सुरु असलेल्या चर्चेला काही अर्थ नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com