चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना थेट भाजपसोबत जाऊन उपमहापौरपदाला गवसणी घातल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता हाच पॅटर्न परभणीमध्ये लागू होतो का अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्या 12 फेब्रुवारीला परभणी महापालिकेतील महापौरपदाची निवड होणार आहे. महापालिकेत एकूण 65 जागांपैकी सर्वाधिक जागा 25 जागा ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत, तर आघाडीत असलेल्या काँग्रेसने 12 जागा जिंकल्या आहेत.
यामुळे बहुमत जरी असले तरी भाजपकडून काही नगरसेवकांना संपर्क केला जात असल्याने सत्ता काबीज करण्यात अडचण आणि दगा फटका होऊ नये म्हणून दोन दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांनी आपले नगरसेवक ही सहलीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आज सर्व नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये गेले आहेत.
परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या महापौर व उपमहापौरपदाची निवड परभणीत होणार आहे. मात्र त्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत मार्गदर्शन घेतले.
दरम्यान, संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना परभणीबाहेर हलविल्याची चर्चा रंगली आहे. आता हे महानगरसेवक थेट महापौर-उपमहापौर निवड बैठकीच्या दिवशीच परभणीत दाखल होणार आहेत.त्यामुळे उद्याकडे होणाऱ्या महापौरपदाच्या निवडीवर चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.