Vijay Wakode Death : आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेता हरपला; परभणीतील विजय वाकोडे यांचं निधन

vijay wakode News : परभणीतील आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेते विजय वाकोडे यांचं निधन झाल्याची घटना घडली आहे. परभणीतील विजय वाकोडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
vijay wakode Death
vijay wakode Saam tv
Published On

राजेश काटकर, साम टीव्ही

परभणी : भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे आज सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ६३ व्या वर्षी विजय वाकोडे यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय वाकोडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करत संविधानाचा अवमान केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी घडली. घटना घडल्यानंतर ज्येष्ठ नेते वाकोडे यांनी घटनास्थळी धाव घेतल. त्यांनी तेथील स्फोटक परिस्थिती तात्काळ ओळखून तातडीने अत्यंत संयमाची भूमिका घेतली. दुसऱ्या दिवशीसुद्धा या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनात दरम्यान वाकोडे यांनी संपूर्ण बंद शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. अति उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.

vijay wakode Death
Maharashtra Bandh : परभणी घटनेच्या निषेधार्थ बंद; अंबाजोगाई- कळंब राज्य महामार्ग अडवला; मुंबईसह नांदेड, लातूरमध्येही बंद

परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने ठिकठिकाणी केलेल्या बळाच्या वापराबद्दल तसेच गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांच्या मारहाणीत कारागृहात मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या निधनानंतर वाकोडे यांनी आक्रमक भूमिका घेवून मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरला करावे, अशी मागणी केली होती.

vijay wakode Death
Maharashtra Bandh : परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद; १० ते १२ जणांकडून ST बसवर दगडफेक

तसेच आज सोमवारी दिवसभर पुकारलेल्या राजव्यापी बंददरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात ठाण मांडून वाकोडे त्यांनी या घटनेत न्यायालयनीय चौकशी करावी अशी मागणी केली. आज दिवसभर वाकोडे हे वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत होते. आज सायंकाळी 6.30 वाजता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीत यात्रेतून घरी परतले.

vijay wakode Death
Maharashtra Bandh : परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण, महाराष्ट्र बंदची हाक

अंत्ययात्रेत सहभाग नोंदवून ते घरी परतत असतांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यकर्त्याच्या मदतीने वाकोडे यांनी एका खासगी रुग्णालयात धाव घेतली. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, अशी माहिती हाती आली. दरम्यान, वाकोडे यांच्या निधनाच्या वृत्ताने आंबेडकरी चळवळीसह सर्व क्षेत्रातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com