महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या चौक कर्जत रेल्वे विभागाच्या 10.86 किलोमीटर लांबीच्या दुपदरीकरण प्रकल्पाला भारतीय रेल्वेने मंजूरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पनवेल चौक-कर्जत रेल्वे मार्गाचा चौक कर्जत महत्वाचा भाग आहे. सध्या या मार्गावर एकेरी रेल्वे मार्ग असल्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या क्षमतेवर मर्यादा येतात. दुपदीरकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर अतिरिक्त रेल्वे वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पामुळे प्रत्येक दिशेने दररोज पाच अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्याची क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच दुपदरीकरणामुळे दरवर्षी 18.35 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक हाताळण्याची क्षमता वाढणार आहे. मालगाड्यांना होणारा विलंब आणि थांबे कमी करण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.
रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी दुपदरीकरण, तिपदरीकरण, चौपदरीकरण, उड्डाणपूल आणि बायपास अशा विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भारतीय रेल्वेकडून भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चौक-कर्जत रेल्वे विभागाच्या दुपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेची क्षमता वाढण्यासोबतच प्रवासी आणि मालवाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.