पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचं काम कधी सुरू होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

Pandharpur Temple Corridor: आषाढी एकादशीच्या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती दिलीय.
Pandharpur Temple Corridor:
CM Devendra Fadnavis Reveals Latest Plans for Pandharpur Temple Corridor
Published On
Summary
  • पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचे काम कधी सुरू होणार

  • पंढरपूर कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

  • आषाढी वारीतील विक्रमी गर्दी आणि कॉरिडॉर प्रकल्प

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. विठुरायाची पुजा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर कॉरिडॉरबाबत मोठी अपडेट दिली.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानाने सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं होतं. यावेळी त्यांचे स्वागत उद्योजक राणा सूर्यवंशी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि पोलीस आयुक्त राजकुमार यांनी केलं.

Pandharpur Temple Corridor:
CJP च्या ३ मागण्या अन् सरकारची लेखी हमी; ४८ तासांत सरकारचं मन परिवर्तन कसं झालं?

कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर्षी वारीने नवा विक्रम केलाय. साधराण 25 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत भाविकांची रांग लागली होती. पण, या सर्व भाविकांची अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आलीय. श्री विठ्ठल नामाचा गजर करत भाविक दर्शन घेतलं. जगाच्या पाठीवर असा आनंदाचा सोहळा दुसरा नाहीये. येथे कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी येत असतात.

Pandharpur Temple Corridor:
CJP च्या ३ मागण्या अन् सरकारची लेखी हमी; ४८ तासांत सरकारचं मन परिवर्तन कसं झालं?

पंढरपूर येथे भगवान श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. भाविकांची सातत्याने वाढणारी संख्या लक्षात घेत अधिक प्रशस्त परिसर आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करावी लागेल. ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने यावर्षीच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, सुव्यवस्थित होईल.

Pandharpur Temple Corridor:
शेतकरी कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार, बँक खात्यात कधीपर्यंत येणार पैसा? सरकारनं सांगितली संपूर्ण प्रक्रिया

युवक-युवतीच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात - मुख्यमंत्री

विठूमाऊलीकडे या साकडं घातलं याबाबत पत्रकारांनी विचारलं त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, राज्यात सुख-समृद्धी नांदो, शेतकरी सुखी-समृद्ध होवोत आणि जनतेच्या जीवनात आनंद व समाधान लाभो, अशी प्रार्थना त्यांनी विठूमाऊलीच्या चरणी केली.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तरुणाईसाठी सुरू केलेल्या विकास आणि नव्या संधींच्या प्रवासाला अधिक बळ मिळावं, प्रत्येक युवक-युवतीच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात . विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प अधिक वेगाने साकार व्हावा, यासाठीही भगवान श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना केल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com