पंढरपूर : काँग्रेसकडून पंतप्रधान पदासाठी नाव पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र देशातील (Pandharpur) अनुसूचित जाती जमातीची जनता त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडेल. अशी टीका (BJP) भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली आहे. (Latest Marathi News)
अमर साबळे हे आज पंढरपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसने केलेल्या पंतप्रधान पदाच्या नव्या खेळी मुळे भाजप मध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून (Congress) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन वेळा पराभव करण्यात आला. मात्र आता अनुसूचित जाती जमाती जनतेसाठी लोककल्याणकारी योजना पंतप्रधान मोदींनी राबवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने काही केले, तरी त्यांची खेळी यशस्वी होणार नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पटोलेंच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाही
देशातील जातीय व्यवस्था जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत आरक्षण व्यवस्था ठेवावी लागेल. अस वक्तव्य जर सर संघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. त्यामुळे (Nana Patole) नाना पटोले यांच्या आरएसएस आरक्षण संपवणार या वक्तव्याला अधिक महत्व देण्याची गरज नाही. असा पलटवार साबळे यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.