Kolhapur Corporation : कोल्हापुरात होतेय पाणीचोरी; महापालिकेची राहणार नजर

Kolhapur News : पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी देखील महानगरपालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या पाणी विभागाने पाणी चोरांविरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे
Kolhapur Corporation
Kolhapur CorporationSaam tv
Published On

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरात चोरून पाणी वापरण्याचे प्रमाण वाढलं आहे. नळाचे अधिकृत (Kolhapur) कनेक्शन न घेता महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा वापर केला जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने आजपासून पाणी चोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. (Breaking Marathi News)

Kolhapur Corporation
Jalgaon News : कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने संपविले जीवन; जळगाव जिल्ह्यातील घटना

कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये सध्या विविध नव्या अपार्टमेंट, रो बंगलो आणि खाजगी प्रॉपर्टीची काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कोल्हापूर शहराच्या (Kolhapur Corporation) उपनगरांमध्ये पाणी चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं महानगरपालिकेच्या लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिसरातील फुलेवाडी, रिंगरोडवरील जिल्हा परिषद कॉलनी, नागदेव कॉलनी, बालाजी पार्क, महालक्ष्मी कॉलनी, भूमी नंदन कॉलनी, मधुरा नगरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी देखील महानगरपालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या पाणी विभागाने पाणी चोरांविरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur Corporation
Wardha Accident: ओव्हरटेकच्या नादात टिप्परची रिक्षाला धडक; दोघे ठार, तीन गंभीर जखमी

६५ जणांवर केली कारवाई 

कोल्हापूर महानगरपालिकेचे पाणी हजारो नागरिक चोरून वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महापालिकेने कारवाई करण्यासाठी धडक मोहीम सुरु केली असून महानगरपालिकेच्या पहिल्या दिवशीच्या धडक मोहिमेत साधारण ६५ जणांवर महापालिकेने कारवाई केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com