Pandharpur : आणखी एका भोंदूला बेड्या, पैशांचा पाऊस पाडतो म्हणत लाखो लुबाडले, माढ्यातील धक्कादायक प्रकार

Pandharpur Madha News : माढा तालुक्यात अंधश्रद्धा आणि पैशांच्या आमिषाने लोकांची फसवणूक करणाऱ्या गुरु माऊली उर्फ नाना महाराज वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली. लाखोंच्या फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
FAKE GODMAN GURU MAULI VEERKAR ARRESTED IN MADHA FRAUD CASE | MAHARASHTRA NEWS
FAKE GODMAN GURU MAULI VEERKAR ARRESTED IN MADHA FRAUD CASE | MAHARASHTRA NEWSSaam tv
Published On
Summary
  • भोंदूगिरी करणाऱ्या गुरु माऊली वीरकरला अटक

  • व्यवसायात फायदा करून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

  • पोलिसांनी आश्रमावर छापा टाकला

  • पोलिसांनी वीरकर आणि त्याच्या भावाला ताब्यात घेतले

माढा तालुक्यातील आडेगाव येथे भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आणखी एका तथाकथित बाबाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर भोसले प्रकरणानंतर आता गुरु माऊली उर्फ नाना महाराज वीरकर याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फसवणूक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या प्रकरणामुळे अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील आडेगाव येथे आश्रम उभारून नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर हा अनेक वर्षांपासून भोंदूगिरी करत होता. जादूटोणा, भविष्य सांगणे, पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवणे अशा प्रकारांनी तो लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींचा त्याच्याकडे वावर असल्याने त्याचे बस्तान अधिक मजबूत झाले होते.

FAKE GODMAN GURU MAULI VEERKAR ARRESTED IN MADHA FRAUD CASE | MAHARASHTRA NEWS
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाने वीरकर महाराजाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 2024 पासून या तरुणाला व्यवसायात मोठा फायदा करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. “माझ्याकडील कासव घे, तुझ्याकडे पैशाचा पाऊस पडेल,” असे सांगून त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र व्यवसाय वाढण्याऐवजी त्या तरुणावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.

FAKE GODMAN GURU MAULI VEERKAR ARRESTED IN MADHA FRAUD CASE | MAHARASHTRA NEWS
Shocking : सोलापूर हादरले! जिवलग मित्रानेच काढला काटा, दगडाने ठेचून तरूणाची हत्या

पीडित तरुणाने आतापर्यंत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आज पहाटे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दोन लाख 35 हजार रुपयांच्या फसवणुकीची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुरु माऊली वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास वीरकर यांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतले.

FAKE GODMAN GURU MAULI VEERKAR ARRESTED IN MADHA FRAUD CASE | MAHARASHTRA NEWS
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

या प्रकरणाचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस करत असून आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. या कारवाईमुळे माढा तालुक्यात खळबळ उडाली असून भोंदू बाबांविरोधात नागरिकांनी सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com