Pratap Sarnaik: अखेर पालीकरांचे स्वप्न पूर्ण! अत्याधुनिक बसस्थानक उभारणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Pali ST Bus Stand Redevelopment: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाली-सुधागड एसटी बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी १४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. तीन महिन्यांत भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे.
Pali ST Bus Stand Redevelopment
Pali ST Bus Stand RedevelopmentSaam Tv
Published On

Pali ST Bus Stand Redevelopment: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी (ता. 30) रोजी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाने आपल्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याची सुरुवात केली. मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाली-सुधागड एसटी बसस्थानकाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. बसस्थानकाच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत त्यांनी या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी तब्बल १४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. तसेच येत्या तीन महिन्यांत या प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही देत मंत्री सरनाईक यांनी सुधागडसह संपूर्ण रायगडवासीयांना मोठा दिलासा दिला.

प्रथम त्यांनी बल्लाळेश्वराच्या चरणी नतमस्तक होत कोकणातील रखडलेले विकासप्रश्न मार्गी लागावेत, अशी प्रार्थना केली. श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे यावेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पाली बसस्थानकासाठी सुमारे १५ हजार ७५७ चौरस मीटर जागा सन १९७१ मध्ये संपादित करण्यात आली होती. त्यावर १९७८ मध्ये उभारण्यात आलेली जुनी बसस्थानकाची इमारत कालबाह्य व धोकादायक झाल्यानंतर २०२२ मध्ये ती पाडण्यात आली. तेव्हापासून नव्या बसस्थानकाची मागणी होत होती. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकामाला गती दिली जाईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Pali ST Bus Stand Redevelopment
Crime News: ४० कोटींचा जमीन व्यवहार; वादानंतर महिला वकिलाची आत्महत्या, ज्येष्ठ वकील आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल

या पाहणी दौऱ्यादरम्यान शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत, सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्या शर्मिला बोडके, शरद बोडके, रिपाइं जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनावळे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ, सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घाडके, नगरसेवक विनायक जाधव, पाली शहर प्रमुख ओमकार खोडागळे, युवा नेते सचिन डोबले, मनोज भोईर, मंगेश पालांडे, सूरज शेळके, सोहम खोडागळे, अखिलेश कुलकर्णी, शरद फोंडे, सुबोध पालांडे, अनिल भोईर, श्री धनावडे, चंद्रकांत चव्हाण यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि सुधागड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pali ST Bus Stand Redevelopment
Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; २०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

नव्या अत्याधुनिक बसस्थानकात खालील सुविधा असणार

८ फलाटांचे सुसज्ज बसस्थानक व प्रशस्त प्रतीक्षालय, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे. चालक-वाहकांसाठी विश्रामगृह व चौकशी केंद्र. स्वतंत्र कॅन्टीन, उपहारगृह आणि व्यावसायिक दुकाने. विद्यार्थी व आरक्षणधारकांसाठी विशेष सुविधा आणि प्रशासकीय कार्यालये आदी सुविधा असणार आहेत.

पालीचे चारही प्रमुख प्रश्न सुटणार

यावेळी बोलताना शिवसेना (शिंदे गट) सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की, आमदार महेंद्र दळवी, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पाली परिसरातील चार महत्त्वाचे प्रश्न मंत्रालय स्तरावर सातत्याने मांडण्यात आले होते. यामध्ये पाली बसस्थानकाचा पुनर्विकास, ग्रामीण रुग्णालयाची उभारणी, पाली बायपास मार्ग आणि शुद्ध पाणीपुरवठा योजना यांचा समावेश आहे. या पाठपुराव्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच कामांना गती मिळत असून, आज बसस्थानकासाठी १४ कोटी मंजूर होणे हा याच प्रयत्नांचा भाग आहे. शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत यांनीही या निधीमुळे तालुक्याच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com