Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; २०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

Jacqueline Fernandez: सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिससह सर्व आरोपींना ३ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी आरोपी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
Jacqueline Fernandez
Jacqueline FernandezSaam Tv
Published On

Jacqueline Fernandez: दिल्लीतील बहुचर्चित २०० कोटी रुपयांच्या खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालये या प्रकरणात ठग सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पॉल, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, २०० कोटी रुपयांच्या खंडणी रॅकेटशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गतही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींना आरोपपत्रावरील स्वाक्षऱ्यांसाठी ३ जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

हे संपूर्ण प्रकरण आदिती सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर समोर आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवत तपास सुरू केला. तपास यंत्रणांच्या मते, सुकेश चंद्रशेखरने तुरुंगात असतानाच विविध व्यक्तींना फसवून आणि दबाव टाकून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली. या पैशांचा वापर विविध व्यवहारांसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान,ईडीने आपल्या तपासात दावा केला आहे की, जॅकलिन फर्नांडिसला सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्या होते. यामध्ये लक्झरी वस्तू, दागिने तसेच तिच्या परदेशात राहणाऱ्या कुटुंबीयांनाही मौल्यवान भेटवस्तू दिल्याचा आरोप आहे. पण, या भेटवस्तूंसाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा स्रोत बेकायदेशीर असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असा दावा जॅकलिनने सातत्याने केला आहे.

सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील नातेसंबंधही या प्रकरणामुळे मोठ्या चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोपासून ते महागड्या भेटवस्तूंपर्यंतची चर्चा रंगली होती. या घडामोडींमुळे जॅकलिनची इमेज आणि कामावर परिणाम झाल्याचे मानले जाते. पण, सर्व आरोपांबाबत अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे. ३ जून पुढील सुनावणी असून संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष्या लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com