दुकानावरच्या या पाट्या पाहून तुम्हाला गुजरातमध्ये गेल्यासारखं वाटेल.. मात्र या पाट्या आहेत पालघर जिल्ह्यातल्या..पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाड पर्यंतच्या अनेक हॉटेलवर गुजराती भाषेतील पाट्या पाहायला मिळतायत..त्यामुळे पालघर जिल्ह्यात महामार्गावरून प्रवास करताना आपण गुजरातमध्ये असल्याचा भास होतो त्यामुळे पालघर महाराष्ट्राचं आहे की गुजरातच असा सवाल उपस्थित केला जातोय..
मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या मीरारोड मध्ये हिंदीच्या सक्ती विरोधात आंदोलन होत असतानाच महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले जातय. गुजराती पाट्यांविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जात नसल्याची टीकाही केली जातेय. आता मनसैनिकांनी गुजराती पाट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन या पाट्या हटवायला लावल्यात
एकीकडे वंदे भारत एक्सप्रेसला वलसाडमध्ये थांबा देण्यात आला आहे, मात्र वाढवण बंदरासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याठिकाणी उभा राहतोय.. त्या पालघरला मात्र वंदे भारत एक्सप्रेसला थांबा नसल्यानं स्थानिकांमध्ये संताप आहे. तर दुसरीकडे याचं पालघरमध्ये गुजराती पाट्या लावून मराठीद्वेषाचं बीज कोण पेरतय....? तसंच मराठी पाट्या लावण्याचा जीआर असताना शासनाच्या नियमांची पायमल्ली कोण करतयं.. असा सवालही उपस्थित केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.