OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

OBC Reservation Latest Update : ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मर्यादा ओलांडल्यास ओबीसी आरक्षणात कपात होण्याची शक्यता. जाणून घ्या नेमके कारण.
Devendra Fadanvis News
Devendra Fadanvis NewsSaamTv
Published On

OBC reservation latest news Maharashtra : ओबीसीचे राजकीय आरक्षण कपात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणाची मर्यादा (OBC Reservation Maharashtra News) ५० टक्क्यांच्या आत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेले तर कपात होणार असल्याची माहिती सूत्रींनी दिली आहे. (OBC political reservation update)

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांच्या आत ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानेकडून सरकार देण्यात आले होते. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागास प्रवर्ग (OBC) यांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास ओबीसी आरक्षणात कपात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात आल्याचेही समोर आलेय.

Devendra Fadanvis News
Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने कोर्टाने निवडणूक रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच याच कारणामुळे राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षणाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत राखण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली.

Devendra Fadanvis News
LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com