21 जूनला पुन्हा NEET ची परीक्षा, पुढील वर्षापासून ऑनलाईन होणार पेपर

NEET Exam Update: नीट पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. ही परीक्षा आता २१ जून रोजी परत घेतली जाणार आहे. पुढच्या वर्षीपासून नीटची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
21 जूनला पुन्हा NEET ची परीक्षा, पुढील वर्षापासून ऑनलाईन होणार पेपर
NEET UG Exam Saam tv
Published On
  • नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर

  • 21 जूनला NEET ची फेरपरीक्षा

  • पुढच्या वर्षी NEET ची परीक्षा ऑनलाईन होणार

  • पेपरफुटीनंतर एनटीएचा मोठा निर्णय

  • NEET विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट

पेपरफुटीनंतर NEETची परीक्षा पुन्हा कधी होणार याची उत्सुकता असतानाच एनटीएने नवीन तारीख जाहीर केली आहे. 21 जूनला फेरपरीक्षा होणार आहे. पुढील वर्षी मात्र नीटची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पाहूया एक खास रिपोर्ट...

वैद्यकीय प्रवेश प्रक्रीयेसाठी असलेल्या NEET परीक्षेच्या तारखेबाबतची अनिश्चितता अखेर संपलीय. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं म्हणजेच एनटीएने NEET-UG 2026 ची पुनर्परीक्षा 21 जूनला रविवारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 3 मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पुन्हा कधी परीक्षा होणार? आणि काय बदल होणार? याकडं विद्यार्थी आणि पालक वर्गाचं लक्ष होतं.

21 जूनला पुन्हा NEET ची परीक्षा, पुढील वर्षापासून ऑनलाईन होणार पेपर
NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

- 3 मे 2026 मधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरण्याची किंवा नोंदणी करण्याची गरज नाही

- 3 मेच्या परीक्षेसाठी निवडलेलं परीक्षा केंद्रच फेरपरीक्षेसाठी कायम राहतील

- विद्यार्थ्यांना पसंतीचं शहर निवडण्याचा पर्याय

- फेरपरीक्षेसाठी अतिरिक्त शुल्क नाही. उलट आधी भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत दिले जाणार

- नवीन प्रवेशपत्र 14 जूनपर्यंत ऑनलाईन उपलब्ध करून देणार

- OMR शीट भरताना वाया जाणारा वेळ भरून काढण्यासाठी परीक्षा 15 मिनिटांचा वेळ वाढवला

- वेळ - दुपारी 2 ते सायंकाळी 5.15

- हेल्पलाईन क्रमांक - neet-ug@nta.ac.in

011-4075 9000 / 011- 69227700

21 जूनला पुन्हा NEET ची परीक्षा, पुढील वर्षापासून ऑनलाईन होणार पेपर
NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन; पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीला अटक

विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडू नयेत यासाठी 30 जूनपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. पेपरफुटीनंतर आता शिक्षण मंत्रालयाकडून कडक नियमावली जारी करण्यात आलीय. तसंच पेपरफुटी टाळण्यासाठी पुढच्या वर्षापासून NEETची परीक्षा ऑनलाईन होणार असल्याची घोषणाही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केलीय.

21 जूनला पुन्हा NEET ची परीक्षा, पुढील वर्षापासून ऑनलाईन होणार पेपर
NEET UG 2026: NEET ची पुन्हा परीक्षा कधी होणार? फी किती? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

यापूर्वी 2024 मध्ये देशभरात नीट पेपरफुटी आणि 'ग्रेस मार्क्स'चा वाद झाला होता. तर 2021 आणि 2022 मध्येही काही राज्यांत गैरप्रकार समोर आले होते. त्यामुळे इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने NTAच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या शिफारसी केल्या.

मात्र त्या शिफारशीनुसार काहीच बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे 2026 मध्ये पुन्हा पेपर फुटल्याने सरकारवर नामुष्की ओढवली आहे. सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. यावरुन विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे सरकारनं 21 जूनची नीट परीक्षा तरी नीट पार पाडावी एवढीच अपेक्षा.

21 जूनला पुन्हा NEET ची परीक्षा, पुढील वर्षापासून ऑनलाईन होणार पेपर
NEET पेपर विक्रीचं 'ब्युटी पार्लर', पुण्यात घरपोच पेपर पुरवण्याचं रॅकेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com