NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, प्रश्नपत्रिकेची 30 लाखांना विक्री; नाशिक-पुणे-नगरमधील रॅकेट रडारवर

NEET Exam Paper Leak: नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधून तिघांना अटक करण्यात आली आहे.
NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, प्रश्नपत्रिकेची 30 लाखांना विक्री; नाशिक-पुणे-नगरमधील रॅकेट रडारवर
NEET Exam Paper LeakSaam Tv
Published On
  • नीट पेपरफुटी प्रकरणातील महाराष्ट्र कनेक्शन उघड

  • नाशिक, पुणे, अहिल्यानगर पेपर लीक रॅकेट

  • प्रश्नपत्रिका ३० लाखांना विकल्या

  • सीबीआयकडून या घोटाळ्याचा तपास सुरू

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. नाशिकनंतर अहिल्यानगर आणि पुण्यापर्यंत पेपरफुटीचे धागेदोरे पोहचले आहेत. नेमक्या किती जणांना अटक करण्यात आलीय? पेपर फोडण्याची मोडस ऑपरेंडी काय होती? आरोपींनी प्रश्नपत्रिका किती लाखांना विकली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

२२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET पेपरफुटीचं रॅकेट महाराष्ट्रात सक्रीय असल्याचं उघड झालंय. नाशिकनंतर अहिल्यानगर आणि पुण्यातही याचे धागेदोरे समोर आले आहेत. पेपरफुटीच्या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनारच्या चौकशीनंतर आता अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडेंला सीबीआयनं राहुरीतून ताब्यात घेतलयं...

NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, प्रश्नपत्रिकेची 30 लाखांना विक्री; नाशिक-पुणे-नगरमधील रॅकेट रडारवर
NEET UG Exam: नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली

कोण आहे धनंजय लोखंडे?

- धनंजय लोखंडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमधील माहेगावचा रहिवासी

- कर्नाटकच्या मंगळुरूमधून B.A.M.Sचं शिक्षण

- पुण्याच्या वाघोली परिसरात वैद्यकीय प्रॅक्टिस

- मेडिकल प्रॅक्टिससाठी कन्सल्टिंगचं काम

NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, प्रश्नपत्रिकेची 30 लाखांना विक्री; नाशिक-पुणे-नगरमधील रॅकेट रडारवर
NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

तर दुसरीकडे या प्रकरणात पुण्यातल्या मनिषा वाघमारे या महिलेचं नाव समोर आलं असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिच्या चौकशीतून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. कोण आहे ही मनिषा वाघमारे पाहूयात..

NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन

- बिबवेवाडीत मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर चालवायची

-संशयीत आरोपी मनीषा वाघमारे ही धनंजय लोखंडे आणि विद्यार्थ्यांमधील मुख्य दुवा होती..

- NEET परीक्षार्थींना शोधून त्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची

- मोबाईल आणि लॅपटॉप जप्त, संशयास्पद व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेस सापडले

NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, प्रश्नपत्रिकेची 30 लाखांना विक्री; नाशिक-पुणे-नगरमधील रॅकेट रडारवर
NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

राजस्थानच्या सीकरमध्ये मंगिलाल बिवल आणि दिनेश बिवल या दोन भावांना पोलिसांनी अटक केलीय...यातून नीटच्या पेपरेचे रेटच समोर आले आहेत. कुठे किती लाखांना या प्रश्नपत्रिका विकण्यात आल्या ते पाहूयात. नाशिकचा आरोपी खैरनारनं अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडेकडून 10 लाख रुपयांत प्रश्नपत्रिका विकत घेतली. त्यानंतर नाशिकच्या खैरनारनं हीच प्रश्नपत्रिका 15 लाख रुपयांत हरियाणमधील आरोपीला विकली आणि मग हरियाणाच्या गुरुग्राममधील एका डॉक्टरनं 26 एप्रिलला राजस्थानाच्या बिवल भावांना 30 लाख रुपयात हीच प्रश्नपत्रिका विकल्याची माहिती सूत्रांनी दिलीय

NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, प्रश्नपत्रिकेची 30 लाखांना विक्री; नाशिक-पुणे-नगरमधील रॅकेट रडारवर
NEET UG 2026: NEET ची पुन्हा परीक्षा कधी होणार? फी किती? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, केरळ आणि आता महाराष्ट्र. या कनेक्शनमुळे NEET पेपरफुटीचं हे सिंडिकेट देशभरात पसरल्याचं उघड झालंय. मात्र लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या पेपरमाफियांची पाळंमुळं सीबीआयनं खणून काढणं गरजेचं आहे. नाहीतर पेपरफुटीचं हे दुष्टचक्र असं सुरू राहणार यात शंका नाही.

NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, प्रश्नपत्रिकेची 30 लाखांना विक्री; नाशिक-पुणे-नगरमधील रॅकेट रडारवर
NEET परीक्षा कधी जाहीर होणार? महत्त्वाची अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com