महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; हर्षवर्धन पाटलांनी घेतली बावनकुळेंची भेट, पाटलांच्या झोपेच्या चर्चेला उधाण...

Harshvardhan Patil meet Chandrashekhar Bawankule : हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यातच आता त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान, दोघांमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती आहे.
harshvardhan patil meet chandrashekhar bawankule
harshvardhan patil meet chandrashekhar bawankule Saam Tv News
Published On

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर मला आता शांत झोप लागत आहे, कोणतीही चौकशी नाही, काही नाही. त्यामुळे आनंदात आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या शांत झोपेच्या नावाची चर्चा सुरु आहे. कारण, आता हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे.

हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यातच आता त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवांत झोपेची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांच्या असलेल्या भावनाही मोकळेपणाने व्यक्त केल्या होत्या. भाजपमध्ये गेल्याने आता मला शांत झोप लागते आहे. कोणतीही चौकशी नाही काही नाही. त्यामुळे मी आनंदात आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं.

harshvardhan patil meet chandrashekhar bawankule
Dombivli Crime : 'Excuse me' बोलण्याचा संताप, मराठी बोला सांगत तरुणीला बेदम मारहाण; डोंबिवलीतला थरारक VIDEO व्हायरल

हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जनतेचा आवाज असल्याने मी निवडणूक लढवली पाहिजे, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मी शरद पवारांना भेटलो, त्यांनीही मला सांगितलं की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. त्यानुसार, त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली होती.

harshvardhan patil meet chandrashekhar bawankule
Sunil Shukla : राज ठाकरे हिंदूविरोधी, नास्तिक, यांनी सुपारी घेतलीय; उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांची अरेतुरेची भाषा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com