Praful Patel : राज्य सरकारचे भवितव्य उज्वल वाटत नाही, प्रफुल्ल पटेलांचा टोला

भाजपशी संघर्ष करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं.
Praful Patel
Praful PatelSaam TV
Published On

श्रीरामपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले 50 आमदार व अपक्ष आमदारांमध्ये धुसपूस सुरु आहे. राज्य सरकारमध्ये सर्वकाही अलबेल नाही. त्यामुळे राज्य सरकारचे भवितव्य चांगले व उज्वल वाटत नाही, असं माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. शिर्डीतील राष्ट्रावादीच्या मेळानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपशी संघर्ष करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे. 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली असती तर निकाल काही वेगळाच असता. महाविकास आघाडीचा प्रयोग गुजरातमध्ये होऊ शकत नाही. कारण शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवत नाही. गुजरातमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Latest Marathi News)

Praful Patel
Ajit Pawar : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी विरोधकांच्या टार्गेटवर, अजित पवारांनी पक्षातील नेत्यांना केलं सावध

राज्यात खरा कार्यक्रम कोणाचा होणार हे 2024 मध्ये कळेल. राज्यात सत्ता स्थापन करताना जे घडले ते महाराष्ट्रातील अनेक लोकांना आवडले नाही. आता रवी राणा व बचू कडू यांच्याकडून ज्याप्रमाणे एकमेकांना सांगत आहे त्यातून हे अधिकृतपणे लोकांपुढे जाता आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Praful Patel
संभाजी भिडेंविरोधात पुण्यात महिला कॉंग्रेसचं आंदोलन; टिकली लावण्याबाबत महिला पत्रकारावर केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

मिहान प्रकल्पात टाटाचा प्रकल्प आणण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकार दोघांची आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत अनेक घडामोडी घडल्या. वेदांत फॉक्सकॉन व टाटा एअरबस प्रकल्प राज्यात उभारले जाणार होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूर जवळील विहान येथे प्रकल्प उभारण्यात असल्याची घोषणा केली होती. तसे पत्रही त्यांनी दिले होते, तरीही हा प्रकल्प गुजरातला गेला, असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com