सचिन जाधव, पुणे
Sambhaji Bhide Today News: शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्यावर टीका होतेय. पुण्यात (Pune) महिला कॉंग्रेच्या वतीनं संभाजी भिडेंविरोधात (Sambhaji Bhide) आंदोलन करण्यात आलं. यावेळी भिडेंनी महिलांच्या टिकलीबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला, त्यांच्याविरोधात महिलांनी घोषणाबाजीही केली आहे. (Pune Latest News)
२ नोव्हेंबर २०२२ ला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी टिकली लावली नाही म्हणून त्यांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी कपाळावर टिकली लावलीच पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, लोकशाही प्रत्येकाला सवच्छेने राहण्याचा आणि जगण्याचा हक्क आहे. त्यांच्या विपरित भुमिकेमुळे संभाजी भिडेंविरोधात राज्यभर निदर्शनं होत आहेत.
भिडे म्हणाले होते, 'आमची भावना आहे की, स्त्री भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही. त्यामुळे कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असं मत संभाजी भिडे गुरूजींनी मांडले. संभाजी भिडेंच्या भुमिकेमुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. भिडेंच्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांचा निषेध केला जात आहे.
काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, 'सदर बाब आश्चर्य वाटण्यासारखी आहे. जी लोक मनुवादी आहेत. जे महिलांचा सन्मान करत नाहीत. त्यांनी नेहमी अंधश्रद्धा समोर आणलेली आहे. 'आंबे खाऊन पुत्र प्राप्ती होईल', असा प्रचार-प्रचार करणारे मंडळी आहेत. यांची कीव येत आहे'.
'आज जग कुठं चाललं आहे ? हे कशावर बोलत आहेत ? महिलांचा मान-सन्मान यांचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव समोर करतात. सातत्याने वादग्रस्त विधान करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन 'आरएसएस'चा अजेंडा ही लोक चालवतात. या घटनेचा निषेध मी निषेध करते, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.