Ajit Pawar : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी विरोधकांच्या टार्गेटवर, अजित पवारांनी पक्षातील नेत्यांना केलं सावध

विरोधकांच्या आश्वासनाला बळी पडू नका, असा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना दिला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar saam tv

रश्मी पुराणिक

Ajit Pawar News : शिवसेनेत आमदार, खासदारांच्या बंडखोरीमुळे पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याची प्रयत्न सुरू आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, अजित पवारांनी आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत . आपल्या लोकांना काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका, असा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना दिला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar
संभाजी भिडेंविरोधात पुण्यात महिला कॉंग्रेसचं आंदोलन; टिकली लावण्याबाबत महिला पत्रकारावर केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज, शुक्रवारी शिर्डी येथील पक्षाच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, ' पक्ष बदलणे चूक नाही. आपला पक्ष बदलून वेगळे होऊन मुख्यमंत्री (CM) होणे गैर नाही. पण ज्या घरात वाढलो, ते घर उध्वस्त करणे बेईमानी आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होत आहे. त्यांना वाटतं की, जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे योग्य नाही. शिवसेनेबाबत जे घडले, नाव गेले हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही'

अजित पवार पुढे म्हणाले, ' आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीमध्ये आघाडीची वाट पाहत बसू नका, तो निर्णय लवकरच होईल. मात्र, तुम्ही कामाला लागा. आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा. आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली तरच मित्र पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील.

Ajit Pawar
सोमय्यांची किशोरी पेडणेकरांविरोधात पोलिसांत तक्रार; एसआरए घोटाळ्यावरून केले 'हे' गंभीर आरोप

'बच्चू कडू यांनी एका वाहिनीवर मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणून पद मिळवले ठीक आहे. परंतु पक्षावर दावा करणे योग्य नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राक्षसी महत्वाकांक्षा योग्य नाही. मोठे प्रकल्प आणणे त्यांना जमणार नाही. वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com