NCP Crisis News: शरद पवारांचं नाव, फोटो वापरु नका.. सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश; सुनावणीत काय घडलं?

Supreme Court On NCP Party And Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit Pawar saam tv
Published On

NCP Party And Symbol Hearing:

केंद्रिय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना देण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा करत फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावर आक्षेप नोंदवला. यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश दिले आहेत.

आजच्या सुनावणीत काय घडलं?

आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी "अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात? -ही फसवणूक आहे. आमच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो आहे? असा सवाल उपस्थित केला. तसेच ग्रामीण भागात लोक म्हणत आहेत की घड्याळाला मत द्या. अजित पवार गटाचे पोस्टर्स पाहा, त्यावर शरद पवारांचा फोटो आहे. असे म्हणत अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे पोस्टर्सही न्यायालयात दाखवले.

शरद पवारांचा फोटो, चिन्ह वापरु नये?

"ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे , पण छगन भुजबळ म्हणतात, ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे, असे म्हणत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे?" असाही युक्तीवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Ajit Pawar
Rahul Gandhi: अरबपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ, पण शेतकऱ्यांचा १ रुपयाही नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दरम्यान, यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाहीत अस लेखी द्या, असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने (Ajit Pawar) स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार 18 मार्च रोजी होणार आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Ajit Pawar
Ajit Pawar on Nilesh Lanke : निलेश लंके राष्ट्रवादी सोडणार?; अजित पवार म्हणाले, 'त्याच्या डोक्यात हवा घातलीय'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com