काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात आज तिसरा दिवस आहे. सकाळी राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत यांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मेळाव्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहावयास मिळत आहे. (Latest Politics News)
शेतकऱ्यांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, इथं सर्वात मोठा मुद्दा कांद्याचा भावाचा आहे. मागील दहा वर्षात मोदी सरकारने आपलं एक रुपये तरी माफ केलं का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित (Bharat Jodo Nyay Yatra Nashik) केला. बोलताना ते म्हणाले की, सर्वात श्रीमंत अरबपतीचं 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आहे. कॉंग्रेसचं सरकरा असताना एकदा कर्ज माफ केलं होतं. परंतु भाजपने एकदाही कर्ज माफ केलं नाही. त्यांनी फक्त 20-25 लोकांचं कर्ज माफ केलं आहेत. त्यातून 24 वेळा कर्ज माफ झालं असतं, असंही ते म्हणाले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चांदवडमध्ये शेतकरी संवाद मेळावा
शेतकऱ्यांनी चारही बाजूंनी घेरलं जात आहे. पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही. अरबपतींचं 34 वर्षाचं कर्ज माफ होऊ शकतं, तर शेतकऱ्यांचंही कर्ज माफ होऊ (Bharat Jodo Nyay Yatra) शकतं. आमचं सरकार आलं तर एमएसपी कायदेशीर लागू केली जाईल. पिक विमा योजनेचा पुनर्ररचना केली जाईल, असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींची सभा
आमचं सरकार आल्यास आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या हिताचं राहील. सध्या शेतकऱ्यांना जीएसटी द्यावा लागत आहे, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांनी जीएसटी द्यावा लागणार (Bharat Jodo Nyay Yatra In Maharashtra) नाही. शेतकऱ्याशिवाय देश राहणार नाही, असं वक्तव्य राहुल गांधींनी चांदवडमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना केलं आहे.
अग्निवीरसाठी 6 महिन्याचं ट्रेनिंग मिळणार (Rahul Gandhi In Maharshtra) आहे. अग्निवीरमुळे सेना कमकुवत होत आहे. त्यांना पेंशन, कॅन्टींग, शहिदचा दर्जा मिळणार नाही, असंही ते म्हटले आहेत. काल राहुल गांधींची मालेगावमध्ये सभा पार पडली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.