Rahul Gandhi: राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' आज महाराष्ट्रात, कसा असेल मार्ग?

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: आजपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात सुरू होत आहे. यासाठी कॉंग्रेसकडून मोठी तयारी करण्यात आली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam Tv
Published On

Rupali Badve

Rahul Gandhi In Maharashtra

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. आजपासून नंदूरबार येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आजपासून सुरू होत आहे. यासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. (Latest Marathi News)

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lol Sabha Election) पार्श्वभूमीवर राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येत (Rahul Gandhi In Maharashtra) आहेत. त्यामुळे ही यात्रा अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. हे या यात्रेसाठी राज्यातील सर्वच काँग्रेस कार्यकर्ते एकवटले आहेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करण्यात येत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबारमध्ये राहुल गांधी यांची सभा

नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राहुल गांधी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारपासून करत असल्याचं देखील बोललं जात आहे. राहुल गांधी आपल्या या सभेतून ( Bharat Jodo Nyay Yatra) आदिवासी बांधवांसोबत काय संवाद साधणार, (Politics) हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नंदुरबार शहरातील सीबी ग्राउंड या परिसरात राहुल गांधी यांची सभा होत आहे. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव येतील, अशी व्यवस्था नंदुरबार जिल्हा काँग्रेसकडून करण्यात आलेली ( Bharat Jodo Nyay Yatra In Maharashtra) आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल होत आहे, त्यामुळे काँग्रेसला मोठी उभारी आली आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विचारपूर्वक वक्तव्य करावं; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना सूचना

शिवाजी पार्कवर होणार राहुल गांधींची सभा

राहुल गांधी यांची 17 मार्च रोजी मुंबई शिवाजी पार्क मैदानावर मोठी सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता (Rahul Gandhi News) आहे. राज्य सरकारकडून या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा 12 ते 17 मार्च दरम्यान असणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्च रोजी धुळ्यात, 14 मार्च रोजी नाशिक, 15 मार्च रोजी पालघर आणि ठाणे (Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra) त्यानंतर 16 मार्चला रोजी मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर 17 मार्च रोजी शिवाजी पार्क मैदानावर भारत जोडो न्याय यात्रेच्या समाप्तीची जाहीर सभा पार पडणार आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: मोदींवर ठेवलेला विश्वास म्हणजे 'विश्वासघाताची गॅरंटी'- राहुल गांधीचं मोठं वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com