काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य करताना सजग राहून वक्तव्य करावं, अशी सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. काही आठवड्यांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचना जारी केल्या आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतंही वक्तव्य करताना विचारपूर्वक करावं, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने २३ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. या नोटिशीला उत्तर दिल्यानंतर आयोगाने राहुल गांधींना नोटीस जारी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं की, राहुल गांधी यांच्यासहित सर्व पक्ष, संघटना , उमेदवारांनी देखील या सूचनेकडे लक्ष द्यावं. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान मर्यादांचं भान ठेवावं. राजकीय पक्षांनी आयोगाकडून जारी करण्यात येणाऱ्या आचारसंहितेचं पालन करावं, अशा सूचना आयोगाकडून जारी करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. या आगामी निवडणुकीत भाजप विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढाई होण्याची शक्यता आहे.
भाजपने आगामी निवडणुकीत ३७० जागा जिंकू असल्याचा दावा केला आहे. तर एनडीएने लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांनीही आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात घेण्यात आली होती. तर या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.