Rahul Gandhi: मोदींवर ठेवलेला विश्वास म्हणजे 'विश्वासघाताची गॅरंटी'- राहुल गांधीचं मोठं वक्तव्य

Rahul Gandhi Criticized PM Modi: ग्वाल्हेरमध्ये राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
Rahul Gandhi Criticized PM Modi
Rahul Gandhi Criticized PM ModiYandex
Published On

Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ग्वाल्हेरमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान त्यांनी पंतप्रधानांवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ग्वाल्हेरमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  (latest politics news)

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलंय की, हवाई चप्पल घातलेल्या लोकांसाठी विमानाने प्रवास करण्याचं स्वप्न आहे. नरेंद्र मोदी (PM Modi) ‘गरीबांची सवारी’ हिरावून घेत आहेत. दरवर्षी 10 टक्के भाडेवाढ, डायनॅमिक भाड्याच्या नावाखाली होणारी लूट, वाढलेले रद्दीकरण शुल्क आणि महागडे प्लॅटफॉर्म तिकीट यामुळे गरीबांना ट्रेनमध्ये पायही ठेवता येत नाही. 'एलिट ट्रेन'चे चित्र दाखवून जनतेला फक्त आमिष दाखवलं जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामान्य जनतेची हेळसांड

राहुल गांधी (Rahul Gandhi News) पुढे म्हणाले, सरकारने गेल्या 3 वर्षात ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सूट काढून 3,700 कोटी रुपये गोळा केले आहेत. प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रेनचा वापर केला जात आहे. त्यामुळं सामान्य जनतेची हेळसांड होत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना रेल्वेच्या प्राधान्यक्रमातून वगळण्यात आलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी ग्वाल्हेरमध्ये (Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi) बोलताना म्हटले की, एसी कोचची संख्या वाढवण्यासाठी जनरल डब्यांची संख्या कमी केली जात आहे, ज्यामध्ये केवळ मजूर आणि शेतकरीच नाही तर विद्यार्थी आणि नोकरदार लोकही प्रवास करतात. सामान्य डब्यांच्या तुलनेत एसी कोचचे उत्पादनही तीन पटीने वाढले आहे.

Rahul Gandhi Criticized PM Modi
Rahul Gandhi MSP Promise: केंद्रात सरकार आल्यास एका मिनिटात एमएसपी लागू करू, राहुल गांधींची घोषणा

भारतात बेरोजगारी जास्त

केवळ श्रीमंतांना डोळ्यासमोर ठेवून रेल्वे धोरण आखणं, म्हणजे रेल्वेवर अवलंबून असलेल्या भारतातील ८० टक्के नागरिकांचा विश्वासघात आहे. मोदींवर ठेवलेला विश्वास ही 'विश्वासघाताची गॅरंटी' असल्याचं त्यांनी म्हटलं (Criticized PM Modi) आहे.

राहुल गांधी यांनीही वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारतात पाकिस्तानपेक्षा दुप्पट बेरोजगारी (Rahul Gandhi Criticized PM Modi) आहे. बांग्लादेश आणि भूतानपेक्षा भारतात बेरोजगारी जास्त आहे. या देशात पसरत असलेल्या द्वेषाचे कारण म्हणजे देशातील अन्याय आणि वाढती बेरोजगारी आहे.

Rahul Gandhi Criticized PM Modi
Rahul Gandhi: केंद्र सरकार देशाचा शत्रू; सोशल मीडियावर विद्यार्थ्यांसाठी मेसेज लिहित राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com