Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी वायनाड सोडणार? काँग्रेसविरोधात सीपीआयने ॲनी राजा यांना दिली उमेदवारी

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड मतदारसंघातून सीपीआयने ॲनी राजा यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे राहुल गांधी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam Digital
Published On

Lok Sabha Election 2024

राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड मतदारसंघातून सीपीआयने ॲनी राजा यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे राहुल गांधी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. तेलंगणातील काँग्रेस नेते राहुल गांधींना राज्यातील लोकसभेच्या 1७ पैकी एका जागेवरून निवडणूक लढवण्याचा सल्ला देत असल्याची चर्चा आहे. तर शशी थरूर यांच्याविरोधातही उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत पुन्हा फूट पडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या नेत्यांनी आपली इच्छा केंद्रीय नेतृत्वाला कळवली असून पक्षनेतृत्वानेही ती तत्त्वत: मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीशिवाय खम्मम किंवा भुवनगिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या दोन्ही काँग्रेसच्या सुरक्षित जागा असून त्या पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जातात, डेक्कन हेरॉल्डने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2019 मध्ये तेलंगणात काँग्रेसने 3 जागा जिंकल्या

2019 मध्ये तेलंगणातील लोकसभेच्या 17 जागांपैकी काँग्रेसला फक्त तीन जागा जिंकता आल्या, तर भारती राष्ट्र समिती (BRS) 9, भारतीय जनता पक्षाने (BJP) चार आणि AIMIM ने हैदराबादची पारंपरिक जागा जिंकली. या लोकसभा निवडणुकीत तेलंगणात जागांची संख्या वाढेल, अशी काँग्रेसला आशा आहे.

Lok Sabha Election 2024
Politics News: विधानसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई; भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित, राजकारणात खळबळ

पक्षाला सोनिया गांधींना लढवायचे होते

तेलंगणातील काँग्रेसच्या नेत्यांनी गांधी कुटुंबातील सदस्यांना राज्यातून निवडणूक लढवण्याचे आवाहन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही किमान दोन वेळा प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधींकडे तेलंगणातून निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत सोनिया गांधी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर तिरुवनंतपुरममधून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर खासदार आहेत. या मतदारसंघातही सीपीआयने उमेदवार दिले आहेत. पन्नियान रवींद्रन यांनी तिरुवनंतपुरमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत केरळमध्ये फूट पडल्यांचं मानलं जात आहे.

Lok Sabha Election 2024
Himachal Pradesh Politics : हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये फूट, मुख्यमंत्री बदलण्याची मागणी, भाजपचे १५ आमदार निलंबित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com