Himachal Pradesh Politics : हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये फूट, मुख्यमंत्री बदलण्याची मागणी, भाजपचे १५ आमदार निलंबित

Himachal Pradesh Political Crises : विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेस हायकमांडला फोन करत सतर्क देखील केलं आहे. मुख्यमंत्री बदलला नाही तर राज्यातील सरकार जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Himachal Pradesh
Himachal Pradesh Saam Tv
Published On

Himachal Pradesh Politics :

हिमाचल प्रदेशमधील राजकारणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस दोन गटात विभागली गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी भावुक होत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेस हायकमांडला फोन करत सतर्क देखील केलं आहे. मुख्यमंत्री बदलला नाही तर राज्यातील सरकार जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याबद्दलची नाराजी त्यांनी वरिष्ठांना बोलून दाखवली आहे. (Latest News)

Himachal Pradesh
Rahul Gandhi: केंद्र सरकार देशाचा शत्रू; सोशल मीडियावर विद्यार्थ्यांसाठी मेसेज लिहित राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुख्यमंत्रिपदी नवा चेहरा देण्याची अनेक आमदारांची मागणी आहे. त्यामुळं त्याचा विचार करावा, असं आवाहन विक्रमादित्य यांनी हायकमांडला केलं आहे. काल राज्यसभा मतदानावेळी झालेल्या क्रॉस व्होटिंगसाठी देखील मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता काँगेस नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे सर्वांच याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री बदलासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून दबावतंत्राचा वापर सुरु आहे. राजीनामा दिल्यानंतर आता विक्रमादित्य भाजपसोबत जाऊ शकतात अशीही चर्चा सुरु आहे.

Himachal Pradesh
ISRO: पीएम मोदी आज ISRO च्या दुसऱ्या स्पेसपोर्टचं उद्घाटन करणार

भाजपच्या १५ आमदारांचं निलंबन

हिमाचलमध्ये राजकीय स्थितीदरम्यान विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या १५ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. जयराम ठाकूर, विपिन सिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलवीर शर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूर्ण चंद्र, इंदर सिंग गांधी, दलीप ठाकूर आणि रणवीर सिंग या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com