ISRO: पीएम मोदी आज ISRO च्या दुसऱ्या स्पेसपोर्टचं उद्घाटन करणार

ISRO Second Spaceport Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी करणार आहे. नवीन स्पेसपोर्टमुळे वेळ आणि खर्चात बचत होणार आहे.
ISRO Second Spaceport Inauguration
ISRO Second Spaceport InaugurationSaam Tv
Published On

PM Modi Inaugurate ISRO Second Spaceport

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काल गगनयान मोहिमेवर पाठवल्या जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे जाहीर केली होती. आज (28 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील कुलसेकरपट्टीनम येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) दुसऱ्या स्पेसपोर्टची (ISRO Second Spaceport) पायाभरणी करणार आहेत. (Latest Marathi News)

खाजगी क्षेत्राने बनवलेले छोटे उपग्रह या स्पेसपोर्टवर प्रक्षेपित केले जातील. ISROकडे सध्या सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश येथे आहे. तामिळनाडूच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी हे सतीश धवन अंतराळ केंद्र वरदान मानले जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विकासाला चालना मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन स्पेसपोर्ट (ISRO Spaceport) 2,000 एकर क्षेत्र व्यापणार आहे. नवीन स्पेसपोर्ट थुथुकुडी जिल्ह्यातील वाढ आणि विकासाला चालना देणार आहे. थुथुकुडी येथून रॉकेट लाँच करणे खूपच स्वस्त असणार आहे, कारण आतापर्यंत ध्रुवीय कक्षेत सोडण्यात आलेले सर्व PSSV रॉकेट श्रीहरीकोटा येथून सोडण्यात येत होते.

येथून प्रक्षेपित झाल्यास रॉकेटला सुमारे 780 किलोमीटरचा प्रवास कमी करावा लागेल. इस्रोचे प्रोपल्शन कॉम्प्लेक्स कुलसेकरनपट्टिनमपासून फक्त 88 किमी अंतरावर महेंद्रगिरी येथे आहे. हे कॉम्प्लेक्स श्रीहरिकोटापासून 780 किमी अंतरावर (ISRO Second Spaceport in Tamil Nadu) आहे. थुथुकुडी विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे. म्हणजे रॉकेटच्या प्रक्षेपणानंतर उपग्रहाला त्याच्या कक्षेत पाठवण्यासाठी पृथ्वीच्या अनेक फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसंच इंधनावरील खर्चही कमी होणार आहे.

ISRO Second Spaceport Inauguration
ISRO XPoSat Launch: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोची अभिमानास्पद कामगिरी; 'एक्सपोसॅट' मोहिमेचं यशस्वी उड्डाण

इस्रोचा उद्देश काय आहे?

कुलसेकरनपट्टिनम स्पेसपोर्टवरून व्यावसायिक तत्त्वावर छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्याची इस्रोची योजना आहे. श्रीहरिकोटा येथून लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी जास्त खर्च येतो. कारण, रॉकेटला जास्त अंतर पार करावे लागते. अंतर जितके जास्त असेल तितके जास्त इंधन आवश्यक असते, परिणामी रॉकेटची पेलोड क्षमता कमी होते.

नव्या स्पेसपोर्टमुळे ही समस्या दूर होणार आहे. राज्यातही अनेक उद्योग येतील आणि त्यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील, त्याचा फायदा थुथुकुडी जिल्ह्याला होईल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला (ISRO Second Spaceport in Tamil Nadu) आहे.

ISRO Second Spaceport Inauguration
ISRO 2024: चांद्रयान-3 प्रमाणे इस्रो 2024 मध्येही रचणार इतिहास, वर्षाच्या पहिल्याच दिवशी देणार आनंदाची बातमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com