ISRO 2024: चांद्रयान-3 प्रमाणे इस्रो 2024 मध्येही रचणार इतिहास, वर्षाच्या पहिल्याच दिवशी देणार आनंदाची बातमी

ISRO News: चांद्रयान-3 आणि आदित्य-L1 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2024 मध्ये अनेक अंतराळ मोहिमा राबवणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रो एका अवकाश उपग्रहाची चाचणी घेणार आहे.
Isro Black Hole Mission
Isro Black Hole MissionSaam Tv
Published On

Isro Black Hole Mission:

चांद्रयान-3 आणि आदित्य-L1 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2024 मध्ये अनेक अंतराळ मोहिमा राबवणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रो एका अवकाश उपग्रहाची चाचणी घेणार आहे. सोमवारी पहिल्या एक्स-रे पोलरीमीटर उपग्रहाच्या (एक्सपोसॅट) प्रक्षेपणासह इस्रो नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.

हा उपग्रह ब्लॅक होलसारख्या खगोलीय सृष्टीची रहस्ये उलगडणार आहे. ऑक्टोबरमध्ये गगनयान चाचणी वाहन 'डी1 मिशन'च्या यशानंतर हे प्रक्षेपण केले जात आहे. या मिशनचे सुमारे पाच वर्षांचे असेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Isro Black Hole Mission
Indian Navy: भारतीय नौदलाने अरबी समुदारात वाढवली गस्त, कारण काय?

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV C58 रॉकेट त्याच्या 60 व्या मोहिमेवर मुख्य पेलोड एक्सपोसॅट आणि 10 इतर उपग्रह घेऊन जाईल. जे पृथ्वीच्या निम्न कक्षेत ठेवले जातील. चेन्नईच्या पूर्वेला सुमारे 135 किमी अंतरावर असलेल्या अंतराळ केंद्रातून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी 9.10 वाजता प्रक्षेपणासाठी 25 तासांचे काउंटडाउन सुरू झाले. (Latest Marathi News)

इस्रोमधील सूत्रांनी सांगितले की, "पीएसएलव्ही-सी58 साठी काउंटडाउन आज सकाळी 8.10 वाजता सुरू झाले. यामुळे रहस्यमय जगाचा अभ्यास करण्यात मदत होईल.

Isro Black Hole Mission
Maharashtra New DGP: पोलिस महासंचालक रजनीश शेठ पदावरून निवृत्त, अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळ-आधारित ध्रुवीकरण मापनांमध्ये खगोलशास्त्रीय स्त्रोतांकडून एक्स-रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा पहिला वैज्ञानिक उपग्रह आहे. इस्रो व्यतिरिक्त अमेरिका अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) डिसेंबर 2021 ब्लॅक होलमधून बाहेर पडणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com