Shocking Video: फटाक्यांच्या मार्केटमध्ये अचानक रॉकेट शिरलं, काही सेकंदातच २६ दुकानं पेटली; १२ जण होरपळले

Firecracker Market Fire Video: मथुरा शहरातील गोपाळबाग येथील एका फटाक्याच्या दुकानात अचानक रॉकेट शिरलं अन् बघता-बघता २६ दुकानं पेटली.
Shocking Video massive fire in firecracker market in mathura uttar pradesh
Shocking Video massive fire in firecracker market in mathura uttar pradeshSaam TV
Published On

Firecracker Market Fire Video

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी देशभरात अनेक ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी असल्याने या दिवसात आगीच्या मोठ्या घटना घडल्या. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगलीच दमछाक झाली. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील मथुरा शहरातही पाहायला मिळाला. मथुरा शहरातील गोपाळबाग येथील एका फटाक्याच्या दुकानात अचानक रॉकेट शिरलं अन् बघता-बघता २६ दुकानं पेटली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shocking Video massive fire in firecracker market in mathura uttar pradesh
Rashi Bhavishya: लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्याच दिवशी या राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार, सर्व टेन्शन मिटणार

अचानक आग लागताच बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या लोकांची मोठी धावपळ उडाली. ही आग इतकी भीषण होती, की रॉकेट, सुतळी, बॉम्ब एकापाठोपाठ एक फुटल्याने या घटनेत १२ जण होरपळले. आगीची माहिती मिळताच अग्निमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. अग्निशमन दलाच्या तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोपाळबाग येथील येथील फटाक्यांचं अख्ख मार्केट जळून खाक झालं आहे. त्यामुळे फटाके विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणानिमित्त मथुरा शहरातील अनेक लोक गोपाळबाग येथील फटाका मार्केटमध्ये खरेदीसाठी आले होते. ही घटना घडली तेव्हा फटाका मार्केटमध्ये लोकांची तुफान गर्दी होती. लक्ष्मीपूजनानंतर परिसरातील काही लोकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यातच एक रॉकेट अचानक मार्केटमधील फटाक्याच्या एका स्टॉलमध्ये शिरले.

त्यामुळे दुकानाला मोठी आग लागली. बघता-बघता या आगीने २६ दुकानांना विळखा घातला. सातही दुकानांमधील विक्रीसाठी ठेवलेले फटाके एकापाठोपाठ एक फुटले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत १२ जण होरपळले आहेत. या भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com