ISRO XPoSat Launch: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोची अभिमानास्पद कामगिरी; 'एक्सपोसॅट' मोहिमेचं यशस्वी उड्डाण

PSLV C58 : पुढे सुमारे 22 मिनिटांमध्ये उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित झाला. सदर उपग्रह अंतराळातील प्रमुख प्रकाश स्त्रोत तसेच कृष्णविवरे यांचा अभ्यास करणार आहे.
ISRO XPoSat Launch
ISRO XPoSat LaunchSaam TV
Published On

ISRO Xposat Mission:

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोने मोठी कामगिरी केलीये. साल २०२४ च्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक्सपोसॅट या उपग्रहाची यशस्वी लाँचिंग केलीये. साल २०२४ मधील ही पहिलीच मोहीम असून ती यशस्वीरित्या पूर्ण झालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ISRO XPoSat Launch
ISRO 2024: चांद्रयान-3 प्रमाणे इस्रो 2024 मध्येही रचणार इतिहास, वर्षाच्या पहिल्याच दिवशी देणार आनंदाची बातमी

सोमवारी (१ जानेवारी २०२३) रोजी ९ वाजून १० मिनिटांनी पीएसएलव्ही (PSLV C58) रॉकेटच्या मदतीने XPoSat उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. पुढे सुमारे 22 मिनिटांमध्ये उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित झाला. सदर उपग्रह अंतराळातील प्रमुख प्रकाश स्त्रोत तसेच कृष्णविवरे यांचा अभ्यास करणार आहे.

पीएसएलव्ही उपग्रह ६ डिग्री अँगलला प्रस्थापित करण्यात आलाय. पृथ्वीपासून सुमारे ६५० किलोमीटर उंच अंतरावर हा उपग्रह आहे. सध्या उपग्रह ज्या रॉकेटनेवर पाठला आहे त्याची कक्षा कमी करण्यात आलीये. पुढे आणखी काही वेळासाठी ही मोहीम सुरू राहणार आहे.

तिरुअनंतपुरम येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने देखील एक उपग्रह विकसीत केला आहे. हा उपग्रह देखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आलाय. अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे आणि सौर विकिरण असा या उपग्रहाचा मुख्य उद्देश्य आहे. साल २०२४ मधील पहिलीच मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ISRO XPoSat Launch
Ulhasnagar Crime News: मित्रानेच पाठीत खंजीर खुपसला; जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर प्राणघातक हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com