Ajit Pawar on Nilesh Lanke : निलेश लंके राष्ट्रवादी सोडणार?; अजित पवार म्हणाले, 'त्याच्या डोक्यात हवा घातलीय'

NCP Politics : निलेश लंकेने चुकीची भूमिका घेऊ नये, असं मला वाटतं. काल माझ्या भेटीला आला होता. त्याच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची हवा घातली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar on Nilesh Lanke
Ajit Pawar on Nilesh LankeSaam TV
Published On

सचिन जाधव | पुणे

Ajit Pawar on Nilesh Lanke :

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात जाणार, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. निलेश लंके आजच शरद पवार  गटात प्रवेश करतील, अशी माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. सध्याच्या राजकीय चर्चांवर अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

निलेश लंकेने चुकीची भूमिका घेऊ नये, असं मला वाटतं. काल माझ्या भेटीला आला होता. त्याच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची हवा घातली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

निलेश लंके असा पक्ष सोडून जाऊ शकत नाही. त्याला राजनामा द्यावा लागेल, असं त्याला मी सांगितलं आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit Pawar on Nilesh Lanke
Political News : निलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार?; विश्वसनीय सूत्रांची 'साम टीव्ही'ला माहिती

निलेश लंके पारनेरपुरतं काम करु शकतो- अजित पवार

निलेश लंकेला पक्षात मी घेतलं होतं. निलेशला मनापासून आधार मी दिला होता. निलेश लंकेला मोठ्या प्रमाणात मी मदत केली. लंकेच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली आहे. पण वास्तविक तसं नाही. निलेश लंके पारनेरपुरतंच काम करू शकतो. बाकीच्या मतदारसंघात तो समजतो तेवढं सोपं नाही. मी सांगायचं काम केलंय, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar on Nilesh Lanke
Ahmednagar Politics : सुजय विखेंच्या विरोधात महाविकास आघाडी निलेश लंकेंना मैदानात उतरवणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

निलेश लंके यांनी स्पष्ट बोलणं टाळलं

निलेश लंके शरद पवार गटातील प्रवेशाबाबत अजूनही स्पष्टपणे बोलण्यास टाळत आहेत. आज निलेश लंके यांच्या 'मी अनुभवलेला कोविड' या पुस्तकांचं शरद पवार याच्याहस्ते प्रकाश होणार आहे. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी निलेश लंके पुण्याला निघाले आहेत.

त्याआधी निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी वाजवण्यात आली. अनेक कार्यकर्ते आमदार निलेश लंके यांच्या घराबाहेर गोळा झाले. यावेळी वेळ आणि काळच उमेदवार ठरवेल, असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com