

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचे विलिनीकरण होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे लवकरच दोन्ही पक्षांकडून विलिनीकरणाची घोषणा केली जाईल असे म्हटले जात आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चेबाबत मोठं विधान केले. 'अजितदादा गेल्यावर विलिनीकरणाच्या चर्चा संपल्या. विलिनीकरणाला आमच्याकडून आता फूलस्टॉप.', असे म्हणत सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात विषय संपवला. त्याचसोबत शरद पवार एनडीएसोबत जाणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, 'आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे.राजकारणात रोज तर्क वितर्क चालत राहणार आहे. राजकीय पक्ष असल्याने चर्चा होतात. अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. विलिनीकरणाची तारीख देखील ठरली होती. अजितदादा गेल्यावर विलिनीकरणाच्या चर्चा संपल्या. ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्यादिवशीच माझ्यासाठी विलिनीकरणाचा विषय संपला.'
सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितले की,'माझा भाऊ राहिला नाही आता कसली चर्चा करत आहात. विलिनीकरणाला आमच्याकडून फूलस्टॉप. इथून पुढे विलिनीकरणावर उत्तर देणार नाही. यावर बोलायचा मला आता कंटाळा आला आहे. सुप्रिया सुळेंना अजित पवार गटाकडून कुणाचे फोन, मेसेज, पत्र आलेले नाही.' तसंच, 'राज्यात दुष्काळाचा विषय गंभीर आहे त्याकडे लक्ष द्या. देशासमोर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर बोला, असे त्या म्हणाल्या.
शरद पवार आणि प्रफुल पटेल भेटीवर सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, 'राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे भेठीगाठी होत असतात. आम्ही सेवेसाठी राजकारणात आलो आहोत. आमच्या बैठका लोकांच्या कामासाठी होत्या. भुजबळ आणि आमचे कौटुंबिक संबंध आहे.भुजबळ ८० वर्षांचे, तटकरे ५० वर्षे राजकारणात, पटेल यांनी साहेबांसोबत काम केले. वयाने आणि अनुभवाने सगळे मोठे आहे. सन्मान बोलावे हे माझे संस्कार आहे. चांगल्या वाईट कळत एकत्र राहिले आहोत. सत्ता येते आणि सत्ता जाते मात्र नाती कायम टिकतात.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.