NCP Merger: राज्याच्या राजकारणात खळबळ!'त्या' विधानानंतर सुनेत्रा पवारांकडून आमदारांना थेट कॉल; विलीनीकरणाबाबत काय ठरलं?

Sunetra Pawar, NCP Merger News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sunetra Pawar, NCP Merger News
Sunetra Pawar, NCP Merger NewsSaam tv
Published On: 

NCP merger latest update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मुद्द्यावर अत्यंत सावध भूमिका घेतली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विलिनीकरणाच्या प्रश्नावर "लवकरच कळेल" असे सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आता थेट उपमुख्यमंत्री कार्यालयातून राजकीय हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आमदारांशी फोनवरून संपर्क साधला जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची नेमकी भूमिका काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न या फोनद्वारे केला जात आहे.

Sunetra Pawar, NCP Merger News
मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव ट्रकची लक्झरी बसला धडक; ३० प्रवाशांनी भरलेली बस थेट पलटी, पुढे काय झालं?

या संदर्भात काही आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर साम टीव्हीला विलिनीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या फोनवर आमदारांचे मत जाणून घेण्यात आले. त्यांना प्रामुख्याने तीन प्रश्न विचारण्यात आले आहेत. सध्या पक्षाबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर तुमचे मत काय आहे? दोन्ही पक्षांचे विलिनीकरण करणे योग्य वाटते का? आणि शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी दावा केल्याप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तुमच्याशी खरंच संपर्क साधण्यात आला आहे का? अशी विचारणा आमदारांकडे करण्यात आली आहे.

Sunetra Pawar, NCP Merger News
Cheque Book Rule : व्यवहारासाठी CTS चेक बुक चालणार नाही, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

दुसरीकडे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार गेल्यानंतर विलिनीकरणाचा विषय संपला असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच आपल्याकडे सध्या असा कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या या विधानानंतरही, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून आमदारांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.