Cheque Book Rule : व्यवहारासाठी CTS चेक बुक चालणार नाही, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

RBI cheque book rules : १ जानेवारी २०२७ पासून जुने CTS चेकबुक बंद होणार आणि नवीन चेकबुक घ्यावे लागणार, असा मेसेज व्हायरल होतोय. मात्र, आरबीआयने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.
RBI Cheque Book Rules
RBI Cheque Book RulesAI Image
Published On: 

नमस्कार मी शिवाजी शिंदे... व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत... आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... 1 जानेवारीपासून चेक बुकचे नियम बदलणार असल्याचा दावा करण्यात आलाय... त्यामुळे तुमचं जुनं चेक बुक व्यवहारांसाठी चालणार नाहीये...पण, खरंच चेक बुकच्या नियमांत बदल होणार आहेत का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...

1 जानेवारीपासून चेकबुकचे नियम बदलणार आहेत असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...या मेसेजमुळे आता ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय...खरंच आता चेकबुकचे नियम बदलणार आहे का...? नियम बदलले तर पुन्हा चेकबुक नव्याने घ्यावं लागणार आहे का...? असे प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे नक्की काय नियम बदललेयत याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

RBI Cheque Book Rules
Ladki Bahin Yojana : दिवाळी संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० कधी येणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत नवीन अपडेट

व्हायरल मेसेज काय?

1 जानेवारी 2027 पासून CTS चेक बुकच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. 31 डिसेंबर 2026 नंतर सध्याची चेक बुक बदलून नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली चेक बुक घ्यावी लागतील.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...खरंच आता CTS चेकबुकमध्ये बदल करण्यात येणार आहे का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमच्या व्हायरल सत्य टीमने सामच्या प्रेक्षकांसाठी अधिक माहिती मिळवली...आधी CTS चेकबुक नक्की काय आहे पाहुयात...

चेक ट्रंकेशन सिस्टीम (CTS) म्हणजे काय?

CTS ही एक इलेक्ट्रॉनिक चेक क्लिअरिंग प्रणाली

CTS प्रणालीमुळे चेक प्रत्यक्षात पाठवण्याची गरज नाही

चेक एकाच दिवसात क्लिअर होतात

चेक चोरीला जाण्याची किंवा फेरफार होण्याची शक्यता कमी

आता CTS चेकसंदर्भात माहिती मिळाली...मग नक्की यामध्ये कोणते बदल करण्यात आलेयत का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

RBI Cheque Book Rules
Horoscope : माता लक्ष्मीची कृपा कोणावर बरसणार? जाणून घ्या १२ राशींचं भविष्य, शुक्रवारी तुमच्या भाग्यात काय?

व्हायरल सत्य

चेक बुकचे नियम बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही

CTS चेक बाबत व्हायरल मेसेज दिशाभूल करणारा

सध्या चेक बुक्सबाबत कोणतेही उपाय लागू केलेले नाहीत

चेकबुक संदर्भात तुम्हाला असे कोणतेही मेसेज आले तर सावध राहा... कोणतेही चेकबुकचे नियम बदलले जाणार नाहीयेत...केंद्रीय बँकेने तसं स्पष्ट केलंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत 1 जानेवारीपासून चेक बुकचे नियम बदलणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.