Horoscope : माता लक्ष्मीची कृपा कोणावर बरसणार? जाणून घ्या १२ राशींचं भविष्य, शुक्रवारी तुमच्या भाग्यात काय?

Horoscope today, Friday : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी माता लक्ष्मीची कृपा कोणत्या राशींवर होणार? मेष ते मीन अशा सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर.
Horoscope Today News
Horoscope Today News AI Image
Published On: 

मेष (Aries)

रखडलेले जुने काम मार्गी लागेल. घरातील लहान भाऊ-बहिणींना करिअरमध्ये मोठी उपलब्धी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अनावश्यक वाढणाऱ्या खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण राहील. प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी योग आणि व्यायामाची सवय ठेवा.

वृषभ (Taurus)

आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. एखाद्या खास मित्राच्या सल्ल्यामुळे धनलाभ होईल. परदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. वैवाहिक व लव्ह लाईफमध्ये गोडवा वाढेल. तेलकट आणि मसालेदार खाणे टाळा आणि पौष्टिक आहारावर भर द्या.

मिथुन (Gemini)

नोकरी बदलण्याची किंवा करिअरमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमची कामगिरी अप्रतिम राहील आणि मॅनेजमेंटमध्ये तुमचा मान वाढेल. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. संपत्तीच्या वाटणीसंदर्भातील निर्णय घरातील ज्येष्ठांच्या मदतीने सुटतील.

कर्क (Cancer)

आर्थिक बाजू मजबूत होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. ऑफिसमधील काम कौतुकास्पद राहील. कुटुंबातील मंडळींसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन होईल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा, नात्यात अधिक जवळीक येईल.

सिंह (Leo)

आर्थिक व्यवहारांमध्ये थोडी काळजी घ्या, गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ऑफिस पॉलिटिक्सपासून लांब राहा आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. कष्टाचे चीज होईल आणि बॉसकडून कौतुक होईल. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे कामातील सर्व अडथळे दूर होतील.

कन्या (Virgo)

कामाचा ताण वाढल्याने दिवस थोडा व्यस्त जाऊ शकतो. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. खर्चाचे प्रमाण वाढल्याने मन थोडे अस्वस्थ राहील. ऑफिसचा ताण घरी आणू नका. मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योग आणि मेडिटेशनची मदत घ्या.

तुला (Libra)

नवीन आर्थिक नियोजन करा आणि बचतीवर भर द्या. यामुळे भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबातील एखाद्या समारंभाला हजेरी लावण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात कोणा खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते.

वृश्चिक (Scorpio)

तुमच्या सृजनशीलता (Creativity) आणि कामाचे ऑफिसमध्ये भरभरून कौतुक होईल. पैशांचे निर्णय घेताना गांभीर्य ठेवा. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. मन थोडे अज्ञात भीतीमुळे विचलित होऊ शकते, अशा वेळी जोडीदाराशी मन मोकळे करा.

Horoscope Today News
Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण! सराफ बाजारात २५० कोटींची उलाढाल; जाणून घ्या नवे दर

धनु (Sagittarius)

पैशांची आवक चांगली राहिल्याने आर्थिक बाजू भक्कम होईल. घरातील सुख-सुविधांच्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी प्रगती पाहिला मिळहमेल.

मकर (Capricorn)

सहकाऱ्यांच्या मदतीने रखडलेले प्रोजेक्ट पूर्ण होतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या मित्राची अचानक भेट झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

Horoscope Today News
Ladki Bahin Yojana : दिवाळी संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० कधी येणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत नवीन अपडेट

कुंभ (Aquarius)

ऑफिसमध्ये वरिष्ठांचा पूर्ण सपोर्ट मिळेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्यामुळे पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतील. कामाच्या अतिरेकानुसार स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा, मन प्रसन्न होईल.

मीन (Pisces)

गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे योग आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे करिअरमध्ये नवी दिशा सापडेल. आध्यात्मिक कार्यात रुची वाढल्याने मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण शांत आणि प्रेमळ राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.