

देशात पुढील काही दिवसांत पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या आगामी निवडणुकांसाठी बहुतांश राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे दोन्ही गट पाच राज्यांच्या निवडणुका लढवणार नसल्याची माहिती हाती आली आहे. पक्षाच्या निवडणूक चिन्हाची लढाई सुरू असताना दोन्ही गटाचा महत्वाचा निर्णय समोर आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. 'आम्हाला बाकी राज्यात काम करायची गरज होती, पण आम्हाला काम करता आलं नाही. त्यामुळं आम्ही निवडणूक लढणार नाही,अशी माहिती प्रफुल्ल पटेली यांनी दिली आहे.
पक्षाच्या बैठकीबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, ' दर मंगळवारी आमदार आणि मंत्री यांची बैठक होत असते. त्यात अडचणी सांगितल्या जातात'.
'मराठा समाजाला आरक्षण द्यायला कोणाचाही विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं देता येईल हे पाहायला हवं. कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्यायचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली
राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाला सुरुवात होणार आहे, याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले, ' आम्ही राष्ट्रवादीचे नवीन कार्यालय नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सुरू करणार आहोत'.
माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या आरोपाविषयी भाष्य करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, 'मीरा बोरवणकर यांनी आरोप करणं कितपत योग्य आहे. अजित पवार यांनी ज्या काही सूचना केल्या होत्या, त्याचा रिमार्क आहे का? पुस्तक विकण्यासाठी असं करणं योग्य नाही. अजित पवार यांनी याबाबत फक्त विचारणा केली. आर आर आबा यांनी रद्द केली हे सगळे एकाच पक्षाचे होते. यात काही तथ्य नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.