NCP Politics News: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, अजित पवार गटातील १५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

Jayant Patil Big Claim: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, अजित पवार गटातील १५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?
Jayant Patil Big Claim
Jayant Patil Big ClaimSaam Tv
Published On

>> रुपाली बडवे

Jayant Patil Big Claim:

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय ]राजकीय भूकंप घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलेला खबळजनक दावा आहे. जयंत पाटील याणी दावा केला आहे की, त्यांच्या संपर्कात अजित पवार गटातील १५ आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकरणात एकच खळबळ माजली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुणे जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन भाषण केलं. त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jayant Patil Big Claim
Political News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ४३ वर्षे सोबत असलेल्या बड्या नेत्यानं दिला महत्वाच्या पदाचा राजीनामा

या भाषणात जयंत पाटील यांनी सांगितल की, ''अजित पवार गटातील १५ आमदार हे आपल्या संपर्कात आहेत. त्यांची ईच्छा आहे की, पुन्हा ते शरद पवार यांच्याकडे यावेत. पण त्यासंदर्भात अंतिम निर्णय हे शरद पवार घेणार आहेत.''

पाटील म्हणाले की, ''पक्ष आणि चिन्हच्या संदर्भात अजित पवार गटात गोंधळ आहे. त्यांना वाटल होत की, आपल्याला पक्ष आणि चिन्ह मिळून जाईल. पण तसं झालं नाही. आपल्या पक्षाचा खालचा कार्यकर्ता हा कुठे ही गेला नाही. त्यामुळे याची दखल निवडणूक आयोगाला देखील घ्यावी लागली आहे.'' (Latest Marathi News)

Jayant Patil Big Claim
NCP Crisis: शरद पवारांचा शब्द अजित पवार गटानं पाळलाच; बड्या नेत्यानं सांंगितलं नेमकं काय केलं?

ते म्हणाले, ''शिरूर आणि बारामती हे दोन्ही मतदार संघ हे पुण्यातील आहे आणि या मतदार संघात आपला खासदार हा निवडून आला आहे. आगामी काळात या मतदार संघात आपल्याला खूप काम करायच आहे. ताईंच्या मतांच्या टक्क्यांत वाढ होईल, त्या अनुषंगाने कामाला लागा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com