NCP Crisis: शरद पवारांचा शब्द अजित पवार गटानं पाळलाच; बड्या नेत्यानं सांंगितलं नेमकं काय केलं?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असून जोरदार संघर्षही पाहायला मिळत आहे.
ncp crisis
ncp crisisSaam TV

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

Maharashtra NCP Crisis:

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असून जोरदार संघर्षही पाहायला मिळत आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी अजित पवार गटाला त्यांचे फोटो वापरण्यास मनाई केली होती. शरद पवार यांच्या या इशाऱ्याची अजित पवार गटाने गंभीर दखल घेतली असून प्रफुल पटेल यांनी याबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.

नव्या कार्यालयात शरद पवारांचा फोटो नाही...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या दिल्लीमधील पक्ष कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. लवकरच या कार्यलायात अजित पवार यांच्या बैठका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावणे टाळले असून प्रफुल पटेल यांनी यावर स्पष्टिकरण दिले आहे.

काय म्हणाले प्रफुल पटेल?

"दिल्लीत (Delhi) आम्ही नव्या कार्यालयाचे नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये उद्घाटन करत आहोत. शरद पवार (Sharad Pawar) यांची इच्छा होती की त्यांचा फोटा लावून नये, म्हणून फोटो लावला नाही. अजित पवार आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा फोटो वापरला जाईल... असे प्रफुल पटेल म्हणाले.

ncp crisis
Cyclone Tej: सावधान! अरबी समुद्रात येणार 'तेज चक्रीवादळ; मुंबईला आस्मानी संकटाचा धोका?

तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "येत्या आमच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. तसेच आम्हाला बाकी राज्यात काम करायची गरज होती पण आम्हाला काम करता आले नाही, त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार नाही," असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या महिला आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या आरोपावरही प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी स्पष्टिकरण दिले. मीरा बोरवणकर यांनी आरोप करणं कितपत योग्य आहे. ज्य काही सूचना अजित पवार यांनी केल्या होत्या त्याचा रिमार्क आहे का? पुस्तक विकण्यासाठी असं करणं योग्य नाही, असे प्रफुल पटेल यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

ncp crisis
Cyber Crime: जीवनसाथी ॲपवर ओळख; वनरक्षक महिला कर्मचारीला फसविले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com