Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

Cyber Crime: जीवनसाथी ॲपवर ओळख; वनरक्षक महिला कर्मचारीला फसविले

Jalgaon News : जीवनसाथी ॲपवर ओळख; वनरक्षक महिला कर्मचारीला फसविले
Published on

जळगाव : जीवनसाथी ॲपवर नोंदणी केल्याने त्यावर सर्व माहिती अपलोड केलेली होती. यावर मोबाईल क्रमांक (Jalgaon) असल्याने त्यावर संपर्क करून तरुणीशी ओळख केली. या ओळखीतून चोपडा तालुक्यात महिला वनरक्षक पदावर कार्यरत ३३ वर्षीय तरुणीची आर्थिक फसवणूक (Cyber Crime) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Live Marathi News)

Cyber Crime
Grampanchayat Election: अर्ज दाखल करणाऱ्यांना सर्व्हर डाउनचा त्रास; नामनिर्देशनासाठी ३ दिवस बाकी

सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. यात सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक (Fraud) करत असल्याचे समोर येत आहे. यात आता जीवनसाथी ॲपच्या माध्यमातून संपर्क वाढवून फसवणूक केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे. यात भूलथापा देत गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील बँक खात्यावर पेटीएमद्वारे चार लाख ८९ हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला. 

Cyber Crime
Jalna News : जालना-भोकरदन महामार्गासाठी अवैध मुरूम उत्खनन; कंपनीला ३१७ कोटी ४६ लाखाच्या दंडाची नोटीस

सनिष अमितराव पेमा याने विविध इलेक्ट्रिक साधनाचा वापर करून तक्रारदार महिलेशी जीवनसाथी ॲपवर संपर्क केला. त्यानंतर विश्वास संपादन केला. वेगवेगळे कारण सांगत बँक खात्यावर पेटीएमद्वारे चार लाख ८९ हजार रुपये उकळले. पैसे दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने (Cyber Police) सायबर पोलिसांत तक्रार दिली. यावरून संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com