Jalna News : जालना-भोकरदन महामार्गासाठी अवैध मुरूम उत्खनन; कंपनीला ३१७ कोटी ४६ लाखाच्या दंडाची नोटीस

Jalna News : जालना-भोकरदन महामार्गासाठी अवैध मुरूम उत्खनन; कंपनीला ३१७ कोटी ४६ लाखाच्या दंडाची नोटीस
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

जालना : जालना ते भोकरदन रस्त्याच्या चौपदरीकरण सुरु आहे. या कामादरम्यान जालना ते राजुर या २४ किमीच्या कामासाठी (Jalna News) अजयदीप इंफ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला निविदा देण्यात आली आहे. या काम दरम्यान कंपनीने अवैधरित्या जास्तीचा मुरूम उत्खनन केला. या प्रकरणी कंपनीला ३१७ कोटी ४६ लाख रुपयांचा दंड थोटावला आहे. (Breaking Marathi News)

Jalna News
Crop Insurance: पिक विम्यासाठी कंपन्यांची तांत्रिक कारणे; विभागीय आयुक्तांकडे अपिलात गेल्याने विमा देण्यास विलंब

जालना- भोकरदन महामार्गाची अजयदीप इंफ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला महसूल विभागाकडून पीर पिंपळगाव परिसरातील सहा हजार ब्रास मुरूम गौण खनिज उत्खनन करण्याची परवानगी दिली होती. मात्र कंपनीने तब्बल दोन लाख ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे तलाठ्याने केलेल्या पंचनाम्या नंतर (Bhokardan) निष्पन्न झाले होते. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता दीपक डोंगरे यांच्याकडून महसूल विभागाला तक्रार दाखल करत याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. महसूल विभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली. चौकशी दरम्यान कंपनीने तब्बल दोन लाख ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे निष्पन्न झाल्याने महसूल विभागाच्या तहसीलदार छाया पवार यांनी तातडीने कारवाई करत अजयदीप इंफ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २४९ कोटी २५ लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

Jalna News
Grampanchayat Election: अर्ज दाखल करणाऱ्यांना सर्व्हर डाउनचा त्रास; नामनिर्देशनासाठी ३ दिवस बाकी

तसेच बदनापूर महसूल विभागानेही या प्रकरणी चौकशी करत बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव या ठिकाणी कंपनीने अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याचे चौकशी दरम्यान समोर आल्यानंतर बदनापूर महसूल विभागाकडून ही अजयदीप इंफ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ६८ कोटी २१ लाखांची नोटीस बजावली आहे.या प्रकारणी कंपनीकडून अद्याप कुठल्याच प्रकराचा खुलासा करण्यात आला नसला तरी वाजवी पेक्षा जास्त अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याने कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com