अभिजीत देशमुख
शिवसेना फुटीनंतर पक्षात ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. मोठ्या कायदेशीर लढ्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला. मात्र पक्षफुटीनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती आजपर्यंत सुरुच आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीत मोठा धक्का धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. थरवळ यांच्यावर डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सदानंद थरवळ हे 1980 पासून म्हणजे तब्बत 43 वर्ष शिवसेनेत कार्यरत होते. 43 वर्षात नगरसेवक, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख पदांची जबाबदारी होती. संघटना वाढीसाठी आपल्याकडून अपेक्षित काम होत नसल्याने पदाचा राजीनामा दिल्याची माहिती थरवळ यांनी दिली. (Latest Marathi News)
जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिक म्हणून काम करत राहणार, असं थरवळ यांनी स्पष्ट केलं. थरवळ यांचा राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकारणी जाहीर होत असताना थरवळ यांच्या राजीनाम्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Political News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.