Thane News: ठाकरे गटाला मोठा धक्का! ठाणे दौऱ्यावर असतानाच रश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीय शिंदे गटात

Shivsena Thackeray Group News: रश्मी ठाकरे ठाणे दौऱ्यावर असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
rashmi thackeray
rashmi thackeray

Maharashtra Political News:

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. एकीकडे निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असतानाच राजकीय पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग, आऊटगोईंग सुरू आहे. एकीकडे रश्मी ठाकरे ठाणे दौऱ्यावर असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसून दौऱ्याचे नियोजन करणाऱ्याच महिला पदाधिकाऱ्याने रामराम ठोकला आहे.

rashmi thackeray
D. Krishnakumar: कलयुगातील श्रावणबाळ! नोकरी सोडून आईसोबत देवदर्शन; स्कूटरवरुन केला ७८ हजार KMचा प्रवास, माय- लेक कोल्हापुरात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) ठाणे दौऱ्यावर असताना शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. मिना कांबळी या रश्मी ठाकरे यांच्या सर्व दौऱ्याचे नियोजन करत होत्या. तसेच महिलांचे मेळावे घेण्यात, शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी मीनाताई ठाकरे यांच्या सोबतही काम केले होते. आज रश्मी ठाकरे ठाणे दौऱ्यावर असतानात त्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

rashmi thackeray
Nashik News : तालुका दुष्काळी जाहीर न झाल्यास न्यायालयात जाणार : आमदार सुहास कांदे

या प्रकरणी बोलताना ठाणे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. "रश्मी ठाकरे या ठाण्यात स्टंट करण्यासाठी गेल्या पण त्यांच्याच पक्षातील नेत्या आमच्या पक्षात आल्या आहेत. बाहेरच्या लोकांना घेऊन ते आरती करण्यास ठाण्यात गेल्या. पण देवीची आरती फक्त दोन वेळा होते एक सकाळी आणि दुसरी संध्याकाळी, त्या दुपारी आरती करतात त्यामुळे देवी आम्हाला पावली, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)

rashmi thackeray
Lalit Patil Case: अंधारेंकडून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आरोप, त्यांचा बोलविता धनी कोण? ललित पाटील प्रकरणावरून मंत्री भुसे यांचा सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com